मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे. जयश्री बोस यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो ३ च्या व्यवस्थापकिय संचालक पदावरुन जानेवारी महिन्यात त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मार्च महिन्याच्या अखेरीस करोना विषाणू व्यवस्थपानाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमण्यात आलं आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले होते.

अश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. डिसेंबर महिन्यात शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांना करोना विषाणू व्यवस्थापन समितीत सहभागी करुन घेण्यात आलं होतं. आता त्यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे.

appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
navi mumbai, cctv camera, navi mumbai cctv camera
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

आज मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांचीही बदली झाली. त्याचपाठोपाठ संजीव जैस्वाल आणि अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे.