scorecardresearch

“… आम्ही आता सगळे काही संपवून टाकू” म्हणत, समीर वानखेडेंना ट्विटरवरून धमकी

नवाब मलिक यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी धमकी देण्यात आली.

“… आम्ही आता सगळे काही संपवून टाकू” म्हणत, समीर वानखेडेंना ट्विटरवरून धमकी
(संग्रहीत छायाचित्र)

अंमलीपदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना ट्विटरवरून धमकी देण्यात आली आहे. याबाबत वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे.

“तुम्ही जे केले त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आम्ही आता सगळे काही संपवून टाकू.” अशा शब्दात धमकी देण्यात आली आहे. अमन नावाच्या ट्विटवर हँडलवरून धमकी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्विटवरून संदेश पाठवून धमकी देण्यात आली. वानखेडे यांनी याबाबत पोलिसांना कळवले असून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी तक्रारदार समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. नुकतीच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून वानखेडे यांना दिलासा मिळाला होता. याप्रकरणी आता बदनामी करणे व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा करण्यात आला असून याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी करत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former mumbai ncb zonal director sameer wankhede received death threats on social media mumbai print news msr

ताज्या बातम्या