scorecardresearch

Premium

शिवसेना प्रमुखांनंतर आणखी एक भीष्म पितामह गमवला – उद्धव ठाकरे

वाजपेयी यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वाजपेयी यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमवला, पण ते सदैव आमच्या हृदयात राहतील. अटलजी अमर आहेत असे म्हणत उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उद्धव ठाकरे आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत.

jaykumar gore and jayant patil
जिहे-कठापूरच्या टेंडरवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आ. जयकुमार गोरेंचा हल्लाबोल ; जयंत पाटील यांना खुले आव्हान
BJP in Pune
पुणे भाजपवर घराणेशाहीचा पगडा, जुनेजाणते घरी
MNS Chief Raj Thackeray Meets Eknath Shinde
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी, गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर रंगल्या राजकीय चर्चा?
amit shah eknath shinde varsha home pray ganpati
गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब ‘वर्षा’ निवासस्थानी घेतलं गणरायाचं दर्शन

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव सकाळी ६ ते ९ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १० ते १ दरम्यान पार्थिव भाजपा केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येईल. दुपारी एक ते दीड वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी राजघाटवर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज एम्स रूग्णालयात निधन झाले. साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former pm atal bihari vaajpayee passed away uddhav thakery pay tribute

First published on: 16-08-2018 at 19:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×