सेनेच्या माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अशोक शिंदे यांनी मंगळवारी टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबई : माजी राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्य़ातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी मंगळवारी टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका महत्त्वाच्या असून या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा, असे आवाहन नाना पटोले यांनी के ले आहे. अशोक शिंदे यांच्या प्रवेशाने हिंगणघाट व वर्धा जिल्ह्य़ात काँग्रेस पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होईल असे पटोले यांनी स्पष्ट केले. अजूनही विविध पक्षातील नेते काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत असेही पटोले म्हणाले. या पक्ष प्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी उपस्थित होते.   नाना पटोले यांनी मंगळवारी टिळक भवन येथे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व विभाग प्रमुखांची बैठकही घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former shiv sena minister joins congress zws

ताज्या बातम्या