scorecardresearch

काँग्रेस-राष्ट्रवादीला चार; शिवसेनेला एक जागा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी जागावाटप

काँग्रेस-राष्ट्रवादीला चार; शिवसेनेला एक जागा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी जागावाटप

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन व शिवसेना एक असे जागा वाटप करण्यात आले आहे. पाच जागांसाठी होणारी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढविली जाणार असून, भाजपशी थेट सामना करण्याची तयारी केली आहे.

करोना साथीमुळे पुढे ढकलण्यात आलेली ही निवडणूक आता १ डिसेंबरला घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. विधान परिषदेच्या पुणे, औरंगाबाद व नागपूर पदवीधर मतदारसंघात आणि पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. त्यापैकी काँग्रेस नागपूर पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघातून लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे व औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. तर अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शिवसेना लढवीत आहे.

यांना संधी..

राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना व पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी व पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत असगावकर हे उमेदवार लढणार आहेत. शिवसेनेने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या