मुंबई : ताडदेव पोलीस वसाहतीतील छताचा भाग कोसळून चौघे जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जखमीवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा – मुंबई : ताडदेवमधील अंध मुलांच्या शाळेत विषबाधा; सात मुले रुग्णालयात
ताडदेव पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक ३ मधील खोली क्रमांक ५१ मधील छाताचा भाग सोमवारी कोसळला. सदनिकेत वास्तव्यास असलेले पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेत जखमी झाले. या दुर्घटनेत मलबार हिल पोलीस ठाण्यात कार्यरत ज्ञानदेव लक्ष्मण सानप (५७) यांच्या डोक्याला, त्यांची पत्नी मिना सानप (५०) यांच्या डोक्याला, मुलगी स्नेहल (२४) हिच्या दोन्ही पायांना व मुलगा वेदांत (१७) याच्या दोन्ही पायांना व बोटाला किरकोळ दुखापत झाली. या चौघांवरही नायर रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले. घटनेची नोंद ताडदेव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.