सीएसएमटी येथे बुधवारी देवीच्या विसर्जनाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने पोलिसांसह चार जणांना धडक दिडली. याप्रकरणी गुरुवारी डोंगरी पोलीस ठाण्यात आरोपी शन बर्जेस याच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा- मुख्य सेवाहक्क आयुक्तपद ८ महिन्यांपासून रिक्त!; सेवा पंधरवडय़ाला मुदतवाढ 

सीएसएमटी येथील डीमेलो मार्ग परिसरात विजयादशमीच्या दिवशी देवी विसर्जन मिरवणुका काढण्यात आली होती. यावेळी विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, यावेळी डीमेलो मार्गावरील चौकात सीएसएमटीच्या दिशेकडून भरधाव वेगात मोटारगाडी येत होती. ही मोटारगाडी थांबरविण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचारी संजय सोनवणे यांनी केला. मात्र, चालकाने मोटारगाडीचा वेग वाढविला आणि दुचाकीवरून जाणारे पती-पत्नी आणि त्याच्या दोन लहान मुलांना धडक दिली.

हेही वाचा- शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे लोकलमधील प्रक्षेपण परवानगीविना ; कंत्राटदाराला दंड ठोठावण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय

यावेळी, मोटारगाडी थांबवण्यासाठी पुढे सरसावलेले सोनवणे यांनाही मोटारगाडीने धडक दिली. तसेच, पोलिसाला धडक लागल्याने मोटारगाडी चालकाने गाडीचा वेग वाढवून समोरच्या अन्य दुचाकींना धडक दिली. मोटारगाडीच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीच्या पायाचे हाड मोडले. तर, दोन्ही लहान मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच, पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन्ही पायाला गंभीर मार बसला आहे. दुचाकीवरील जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनवणे यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर सोनवणे यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम २७९, ३३२, ३३७, ३३८, ३५३, ४२७ आणि मोटार वाहन अधिनियम १९५४ अंतर्गत १८४, १८५ गुन्हा दाखल केला.