scorecardresearch

Premium

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ

राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

mantralay 13
( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ती १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली असून, पाच महिन्यांच्या थकबाकीसह जूनच्या वेतनापासून देण्यात येणार आहे.राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या ३८ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात ४ टक्क्यांनी वाढ करून तो आता ४२ टक्के करण्यात आला.

१ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्या पाच महिन्यांची थकबाकीही रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी प्रसृत केला. राज्यातील १७ लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

cm bhupesh baghel
छत्तीसगड सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले १८९५ कोटी रुपये, २४.५२ लाख लाभार्थी; वाचा काय आहे किसान न्याय योजना!
court hammer
मविआच्या काळातील विकासकामांची स्थगिती उठवली ; उच्च न्यायालयाकडून सर्व याचिका निकाली
rasta roko movement in full rain
“सरकारी शाळा उद्योगपतींना विकू नका” महिला, मुलींसह समनक पार्टीचे रास्ता रोको
Raju Shetty allegation
शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ४०० रुपये न मिळण्यास राज्य शासन जबाबदार; राजू शेट्टी यांचा आरोप

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four percent increase in dearness allowance of state government employees mumbai amy

First published on: 01-07-2023 at 02:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×