मुंबईतील संतापजनक घटना; चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पिशवीत टाकून फेकलं रस्त्यावर

अपहरण करून केलं क्रूर कृत्य

मुंबई उपनगरातील वसईत बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. एका चार वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून ३४ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. क्रौर्याचा कळस म्हणजे अत्याचारानंतर मुलगी मृत पावल्याचं समजून या नराधमाने तिला प्लॉस्टिकच्या पिशवीत टाकून रस्त्यावरच टाकून दिलं. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं. तर आरोपीलाही माणिकपूर येथे बेड्या ठोकल्या. त्याच्यावर बलात्कार, अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांताक्रूझ येथील रहिवासी असलेला आरोपी हा अंधेरी येथील खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ने-आण करणाऱ्या बसवर चालक आहे. वसईहून तो कर्मचाऱ्यांना घेऊन येत असे. खासगी ऑपरेटरची ही बस सहसा भाईंदर (पश्चिम) मधील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे पार्क केली जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसपासच्या झोपडपट्टीतील मुले पार्क केलेल्या बसमध्ये खेळण्यासाठी गेली. त्यावेळी बसचा ड्रायव्हर एका सहकाऱ्यासह तेथे मद्यपान करत बसले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हर वसईकडे जाण्यासाठी निघाला.

बस सुरू झाल्यानंतर काही मुले बसमधून खाली उतरली. मात्र चार वर्षांची मुलगी बसमध्येच झोपल्याने तिला बसमधून उतरता आले नाही. यावेळी इतर मुलांनी आरडओरड करण्यास सुरूवात केल्यानंतर ड्रायव्हरने मुलीसह तेथून पळ काढला. ड्रायव्हरचा शोध घेण्यासाठी मुलीच्या आईने भाईंदर पोलिसांकडे धाव घेतली. परंतु ड्रायव्हरने बस दुसऱ्या ठिकाणी पार्क करत त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी ओरडत असल्याने त्याने तिच्या गळा दाबला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे, असा समजून मुलीला एका बसमध्ये पडलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकले आणि वसईच्या फादरवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ ती पिशवी फेकून दिली. त्यानंतर ड्रायव्हरने तेथून पळ काढला.

रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला त्या पिशवीत हालचाल झाल्याचं दिसून आलं. तो त्या पिशवीजवळ गेला. त्यानंतर पिशवीत मुलगी असल्याचं पाहून त्याने स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या मुलीला जवळच्याच एका स्थानिक रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भाईंदर पोलिसांनी वालईव पोलिसांच्या मदतीने ड्रायव्हरला वसई येथून अटक केली. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यावेळी ड्रायव्हर दारूच्या होता नशेत होता तसेच तो त्या मुलीला ओळखत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Four year old girl was raped and thrown in a bag on the road abn

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!