मुंबई : स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून अडीच कोटी रुपयांची फसवणूक ; ११ जणांविरोधात तक्रार | Fraud by showing the lure of cheap houses mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून अडीच कोटी रुपयांची फसवणूक ; ११ जणांविरोधात तक्रार

स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून अडीच कोटी रुपयांची फसवणूक ; ११ जणांविरोधात तक्रार
( संग्रहित छायचित्र )

स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये स्थानिक राजकीय पदाधिकारी व सरकारी अधिकाऱ्यासह ११ जणांचा समावेश असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. आतापर्यंत अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.तक्रारदार चेतन जायगडे विलेपार्ले येथील येथील रहिवासी आहे. एका निवृत्त पोलिसाच्या माध्यमातून जायगडे यांची नवीन सिंह गोरखा याच्याशी ओळख झाली होती. त्याने गोरेगाव पूर्व येथे एक कंपनी सुरू करून गरीबांना १२ लाख रुपयांत अंधेरी पूर्व येथील चकाला परिसरा घर देण्याचे आमीष दाखवले. सुरुवातीला चार लाख रुपये धनादेशाद्वारे व पाच लाख रुपये रोख रक्कम द्यावी लागेल. तसेच घराचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरीत रक्कम द्यावी लागेल असे जायगडे यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदाराने १३ ऑक्टोबर २०२१ रोजी धनादेशाद्वारे रक्कम कंपनीच्या खात्यावर हस्तांतरित केली.

हेही वाचा >>>बेस्टच्या नोटीसवर कंत्राटदाराचे मौन; मिनी बसची संख्या रोडावली

उर्वरीत काही रक्कम रोख स्वरूपात दिली. त्यानंतर जायगडे यांना बनावट कागदपत्रे देण्यात आली होती. या प्रक्रियेत एमएमआरडीएतील कथित अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे जायगडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्याने जायगडे यांना दिलेली कागदपत्रे खरी असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर घराचा ताबा देण्यासाठी चालढकल करण्यात येऊ लागली. त्यामुळे जायगडे यांना संशय आला. त्यांनी आरोपीने दिलेली कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जायगडे व फसवणूक झालेल्या इतर व्यक्तींनी आरोपींबरोबर बैठक घेतली. अशी कोणतीही योजना नसून आरोपींनी स्वतःच्या वापरासाठी संबंधित रक्कम घेतल्याचे बैठकीत लक्षात आले. आरोपीने जायगडे यांचे पैसे परत करण्याची लेखी हमी दिली. पण त्यानंतरही रक्कम न मिळाल्याने अखेर त्यांनी याप्रकरणी वनराई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘झी टॉकीज’चा मानाचा मुजरा

संबंधित बातम्या

ही ‘राज’नीती मुंबईत कशी जिंकणार?
मुंबई: बदलेल्या राजकारणामुळे अटक; संजय राऊत यांचा उच्च न्यायालयात दावा
मुंबईत नोव्हेंबरमध्ये साडेआठ हजार घरांची विक्री
मुंबई: दुर्लक्षित १८ तलावांची महानगरपालिकेकडून डागडुजी
मुंबई: विभागीय पासपोर्ट कार्यालय शनिवारी सुरू राहणार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबईत नोव्हेंबरमध्ये साडेआठ हजार घरांची विक्री
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ‘व्हल्गर’ म्हणणाऱ्या नदाव लॅपिड यांनी वादानंतर पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…
शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला उदयनराजे अनुपस्थित? राज्यपालांच्या शिवरायांवरील विधानामुळे नाराज असल्याची चर्चा
रविना टंडनच्या ‘भोपाळ डायरीज’चा व्हिडिओ व्हायरल; अभिनेत्रीने मारला समोशावर ताव अन्…
IND vs NZ 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदरचे झुंजार अर्धशतक! न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताने केल्या केवळ २१९ धावा