लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून करीरोड येथील ७२ वर्षांच्या वृद्धासह त्यांच्या नातेवाईकांची ९० लाखांना फसवणूक करण्यात आल्याची तक्रार माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिसांना प्राप्त झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या दोन भागिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-बोरिवलीमधील व्यवसायिकाची १० कोटींची फसवणूक; तीन आरोपी अटकेत

करीरोड येथील रहिवासी असलेले ७२ वर्षीय बिपीन शांतीलाल बावीसी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महेंद्र शहा आणि शैलेश शहाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, १ एप्रिल २०१५ ते ५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपींनी संगनमत करून त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार, बिपीन यांच्यासह पत्नी, भाऊ, वाहिनी आणि अन्य नातेवाईकांनी एकूण ९० लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र हाती काहीच न आल्याने त्यांना फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. पैसे न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी कंपनीचे भागीदार महेंद्र आणि शैलेश यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of 90 lakh by giving lure of good returns on investment mumbai print news mrj
First published on: 07-02-2024 at 11:03 IST