बिहारमधून तीन ठकसेनांना अटक

मुंबई : सिमेंट विक्रीच्या नावाने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या तीन भामटय़ांना बिहारमधून अटक करण्यात पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांना यश आले आहे. गणेश चेंटू राजवंशी, छोटूकुमार शंकर माजी आणि यशपाल शर्मा जगदीश सिंग अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. आरोपींनी एका खासगी कंपनीची सुमारे पावणेअकरा लाख रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

तक्रारदार अंधेरी-कुर्ला रोडवर असलेल्या एका खासगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीची गुजरात राज्यात एक कार्यशाळा आहे. या कार्यशाळेच्या कामासाठी त्यांना सिमेंटची आवश्यकता होती.

या सिमेंटची व्यवस्था करण्याची जबाबदारी वरिष्ठांनी त्यांच्यावर सोपविली होती. त्यामुळे ते एका नामांकित सिमेंट कंपनीची माहिती काढण्यासाठी गूगलवर सर्च करीत होते. या वेळी त्यांना एका खासगी कंपनीच्या माहितीसह एक मोबाइल क्रमांक सापडला. या मोबाइलवर संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तीने तो त्या कंपनीचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून त्यांच्यात व्यवहारासंबंधित बोलणी सुरू केली होती.

या वेळी तक्रारदाराने त्याच्याकडे चार हजार सिमेंट गोण्यांची मागणी केली होती. ते सिमेंट त्यांच्या गुजरातच्या कार्यशाळेत पाठविण्यासाठी त्यांनी तेथील पत्ताही दिला. मात्र सिमेंट पाठवण्यापूर्वी संपूर्ण रक्कम आगाऊ भरण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदाराने कंपनीच्या बँक खात्यातून आरोपीच्या बँक खात्यात १० लाख ७२ हजार रुपये जमा केले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कार्यशाळेत सिमेंटच्या गोण्या पाठविल्या नाहीत. त्याने मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याला मोबाइल क्रमांक बंद असल्याचे दिसून आले. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कंपनीच्या वतीने सायबर पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार दिली होती. या प्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. फसवणुकीची रक्कम बिहार येथील बँकेतून काढण्यात आल्याचे उघडकीस झाले होते. त्यामुळे सायबर पोलिसांचे एक विशेष पथक बिहारला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गणेशला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत छोटूकुमार आणि यशपाल शर्मा यांचे नाव समोर आले. त्यानंतर या दोघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी एक लाख ऐंशी हजार रुपयांची रोख, विविध बँकांचे वीस एमटीएम कार्ड, चार पासबुक, मोबाइल आणि तीन धनादेशांची पुस्तके आदी मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग असल्याने त्यांना अटक करून नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यात ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहे.