संदीप आचार्य

करोना तसेच आर्थिक अडचणींवर मात करत आरोग्य विभागातर्फे वेगवेगळ्या नव्या योजना व उपक्रम राबविण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील निवडक जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात आता खुबे (हिप) व गुडघे बदल शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. करोनाचा सामना करत असतानाच मागील २ महिन्यांपासून आरोग्य विभागाच्या रुग्णालयात या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्या. यातील बहुतेक सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यामातून मोफत करण्यात येत आहेत.

adulterated sweets items eized at saptashrungi fort
सप्तश्रृंग गडावर साडेपाच लाखाचे भेसळयुक्त गोडपदार्थ जप्त
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
Municipal Corporation will fill the contract semi-medical staff on a temporary basis
महानगरपालिका तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी निमवैद्यकीय कर्मचारी भरणार

राज्यातील अनेक ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना गुडघेबदल तसेच खुबा बदलाच्या शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियांसाठी येणारा खर्च काही लाखांमधील असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना हे उपचार परवडणारे नसतात. प्रामुख्याने मुंबईतील महापालिकेच्या सर्व रुग्णालयात तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. तथापि ग्रामीण भागातील रुग्णांचा विचार करून आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या खुबा व गुडघे बदलाच्या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्याचा निर्णय घेतला.

करोनापूर्व काळातच ही सुरुवात झाली होती. करोनामुळे सर्व जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आले. त्यामुळे या शस्त्रक्रिया करण्याचे थांबविण्यात आले होते. गेल्या २ महिन्यांपासून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयासह गडचिरोली, भंडारा, औरंगाबाद, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्हा रुग्णालयात या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत एकूण खुबा व गुडघे बदलाच्या ९३० शस्त्रक्रिया

याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव म्हणाले की आतापर्यंत एकूण खुबा व गुडघे बदलाच्या ९३० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ६ कोटी ९ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात खुबा बदलाच्या ६७८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापोटी ५ कोटी ३८ लाख ३ हजार ५०० रुपये, तर २४३ गुडघे बदल शस्त्रिक्रयांपोटी १ कोटी ४४ लाख ९५ हजार रुपये खर्च आला आहे. गरजू रुग्णांवरील या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात या शस्त्रक्रियांसाठी नोंदणी करण्यासाठी रुग्ण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण भागात शस्त्रक्रियांना चालना देण्याचा प्रयत्न

हिप आणि गुडघ्याच्या समस्या ही राज्यातील वृद्ध रुग्णांना भे़डसावणारी मोठी समस्या आहे. यात वृद्ध लोकांना चालताना त्रास तसेच वेदना होत असतात. याचा विचार करून ग्रामीण भागात या शस्त्रक्रियांना चालना देण्यात आली आहे. नुकतीच वर्धा येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस आणि हिंगणघाट येथील अस्थिरोग शल्यचिकित्सत डॉ. राहुल भोयर, डॉ. आशिष शिंदे यांच्या पथकाने हिप आणि एक गुडघा सांधे बदल शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. तसेच लाभार्थ्यांच्या प्रतीक्षा यादीचा विचार करून दर आठवड्याला एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली, भंडारा, औरंगाबाद, नागपूरमध्येही शस्त्रक्रिया सुरू

पुणे जिल्हा रुग्णालयात नियमितपणे या शस्त्रक्रिया केल्या जात असून आतापर्यंत ११९ हिप व गुडघे बदलाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गडचिरोली, भंडारा, औरंगाबाद, नागपूर येथील जिल्हा रुग्णालयांनीही आता या शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य विभागाने असंसर्गजन्य आजारांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली असून गरीब रुग्णांना जास्तीतजास्त दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असल्याचे आरोग्य संचालक डॉ साधना तायडे यांनी सांगितले.

हेही वाचा : Blood Sugar नियंत्रणात आणायचंय? मग रोज करा ‘हे’ ५ व्यायाम

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ संजय जयस्वाल यांनी त्यांच्या आईची गुडघे बदलाची शस्त्रक्रिया पुणे जिल्हा रुग्णालयात केली. यामुळे लोकांच्या मनातील आरोग्य सेवेविषयीचा विश्वास वाढण्यास मदत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी वर्षात ग्रामीण भागातील रुग्णांच्या हिप व गुडघे बदलाच्या शस्त्रक्रियांना प्राधान्य देऊन जास्तीत जास्त शस्त्रक्रिया केल्या जातील, असे डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले. खरंतर करोनापूर्व काळातच ही योजना सुरू झाली होती. तसेच ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतरच्या सुवर्ण काळात उपचार देणारी स्टेमी योजना गतिमान करण्यासह टेलिमेडीसिन आदी अनेक योजना आगामी काळात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.