लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या विविध आगारातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे. त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त एसटी प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Ganesh utsav, Manmad-Kurla Godavari Express,
मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सव परंपरा खंडित, रेल्वे प्रशासनाचा असहकार
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Lalbagh Ganesh utsav Mandal, Lalbagh Ganesh,
पहिल्याच दिवशी लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीत कोट्यवधींचे दान
Pimpri, Ganesh utsav, police deployed,
पिंपरी : गणेशोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त; ध्वनी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या सूचना
Dangerous schools of Raigad Zilla Parishad continue
रायगड जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळा सुरूच
traffic route changes in nagpur
नागपूर : ‘लाडक्या बहिणी’च्या सुरक्षेसाठी ‘या’ मार्गांवर राहणार बंदी…
Ambazari bridge, Nagpur,
नागपूर : अंबाझरी पूल बांधणीची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढविली, न्यायालय म्हणाले, नागरिकांची पर्वा नाही का?
Traffic changes in Balewadi area on Saturday due to Ladaki Bahin Yojana program
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे बालेवाडी परिसरातील वाहतुकीत शनिवारी बदल

श्रावण मासात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्री जाण्याचे नियोजन करतात. त्यासाठी एसटीने ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येते. त्यात सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जातील. अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना मोफत, ज्येष्ठ नागरिक व महिलांना आणि १२ वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येईल. गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशाप्रकारे सांघिक सहलीचे आयोजन केले जाते.

आणखी वाचा-ठरलं! गणेशोत्सवानंतर मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक

त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मार्लेश्वर अशा तीर्थक्षेत्रांबरोबरच अष्टविनायक, दर गुरुवारी नृसिंहवाडी, औदुंबर दर्शन, शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलीचे आयोजन केले जाते. सवलतीमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळतानाच एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत असे निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. एसटीकडे प्रवाशांचा ओघ वाढतानाच कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा आणि अभिनव उपक्रमांमुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडेल, अशी कामगिरी करण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.