मोबाइलवर पासासोबत फलाट तिकीटही

मध्य रेल्वेवर बहुप्रतीक्षित कागदविरहित मोबाइल तिकीटप्रणाली अखेर ९ ऑक्टोबरपासून लागू होणार असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रणालीचे उद्घाटन करणार आहेत. पश्चिम रेल्वेवर काही महिन्यांपूर्वी ही सेवा सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेने ही सेवा ऑगस्टमध्ये सुरू केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र आता दोन महिन्यांच्या विलंबानंतर ९ ऑक्टोबरपासून ही सेवा मध्य रेल्वेवर सुरू होईल. या प्रणालीद्वारे कागदविरहित उपनगरीय तिकिटांपासून लांब पल्ल्याच्या गाडय़ांची अनारक्षित तिकिटे, मासिक-त्रमासिक पास, प्लॅटफॉर्म तिकीट आदी सर्व सेवा उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या कार्यक्रमाचा हा भाग असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
तिकीट कसे काढाल?
मोबाइल तिकीट काढण्यासाठी ‘यूटीएस ऑन मोबाइल’ हे अ‍ॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. मोबाइलमध्ये अ‍ॅप असेल, तर ते अद्ययावत करावे लागेल. अ‍ॅपमध्ये ‘मुंबई’ हे शहर निवडावे लागेल. तिकीट काढण्यासाठी अ‍ॅपवर असलेल्या ‘आर वॉलेट’ या संकल्पनेचा आधार घ्यावा लागेल. ‘आर वॉलेट’मध्ये पैसे भरण्यासाठी तिकीट खिडक्या किंवा ६६६.४३२ल्ले्रु’ी.्रल्ल्िरंल्ल१ं्र’.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळाचा उपयोग करता येईल. या आर वॉलेटमध्ये कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये एका वेळी भरता येतील. मोबाइलमधून तिकीट अथवा मासिक-त्रमासिक पास काढल्यानंतर तेवढी रक्कम आर वॉलेटमधून वजा होईल.

तिकिटाची वैशिष्टय़े
’मध्य, पश्चिम व हार्बरवर मोबाइल तिकीट शक्य.
’लांब पल्ल्याच्या गाडय़ांची अनारक्षित तिकिटाची सोय
’पास मोबाइलवर उपलब्ध
’छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, पनवेल, लो. टिळक टर्मिनस, ठाणे, मुंबई सेंट्रल, बोरिवली, अंधेरी, दादर (पश्चिम), वसई रोड आणि वांद्रे या स्थानकांसाठीची प्लॅटफॉर्म तिकिटे.
मोबाइल तिकीटासाठी जीपीएस सेवा व जीपीआरएस सेवा हवी. रेल्वेने इस्रोच्या मदतीने मोबाइल तिकीटासाठी सीमारेषा आखून घेतली आहे. त्या भागातच मोबाइल तिकीट मिळणे शक्य होईल. ज्या स्थानकापासून तिकीट काढायचे आहे, त्या स्थानकाच्या दोन कि. मी. पर्यंतच्या आत वा स्थानकापासून वा रेल्वे रुळांपासून ३० मीटर लांब असणे आवश्यक आहे.