परतीच्या पावसानंतर मुंबईत स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा पावसाळा संपण्यास काही कालावधी असताना रशियामधील सायबेरियाहून काळ्या शेपटीचा पाणटिवळा मुंबईत दाखल झाला आहे. या पक्ष्याचे नाव पक्षी अभ्यासकांनी ‘बाला’ असे ठेवले आहे. या पक्ष्याने सायबेरिया ते मुंबईतील भांडुप उदंचन केंद्रापर्यंतचे सुमारे दहा हजार किमीचे अंतर पाच दिवसांत पूर्ण केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- महावितरणाचे विद्युत सहाय्यक पदाच्या पात्र उमेदवारांचे आंदोलन; आठ दिवसांपासून उपोषण सुरू

पक्ष्याला मार्च २०२२ रोजी जीपीएस टॅगिंग केले होते

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या पर्यावरणप्रेमी संस्थेने काळ्या शेपटीच्या पाणटिवळ्या या स्थलांतरित पक्ष्याला मार्च २०२२ रोजी जीपीएस टॅगिंग केले होते. एप्रिल २०२२ रोजी या पक्षाने ठाणे खाडी परिसर सोडला. त्यानंतर सायबेरिया गाठायला जून महिना उजाडला. जून ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सायबेरियात वास्तव्य केले. पक्षाने साधारण १८ सप्टेंबर रोजी सायबेरिया सोडून मुंबईकडे वाटचाल सुरू केली. पाच दिवसात म्हणजे २३-२४ सप्टेंबर दरम्यान मुंबई गाठली. यावेळी त्याने काही ठिकाणी थांबा घेतल्याचा अंदाज आहे. तसेच, त्याने समुद्रावरून प्रवास करण्याऐवजी जमिनीवरून प्रवास केला आहे, अशी माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From siberia to bhandup ten thousand kilometers distance covered by bala pantivla bird in just ten days mumbai print news dpj
First published on: 26-09-2022 at 17:32 IST