“गोसीखुर्द, कोकणातील लोकोपयोगी प्रकल्पांना प्राधान्याने पूर्ण करा”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले निर्देश

(संग्रहित छायाचित्र)

लोकांना जास्तीत जास्त उपयोग होईल तसेच राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेला गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही तातडीने करावी. ज्या योगे स‍िंचनाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागेल असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज(मंगळवार) दिले.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती अडीअडचणी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी असलेल्या उपायासंदर्भातील बैठकीचे आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरील निर्देश दिले.

या बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार सुनिल तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव (जलसंपदा), विजयकुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थ‍ित होते.

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प संदर्भात पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडीअडचणींबाबत निधी, पुनर्वसन संदर्भातील प्रश्नांची या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या ठिकाणचे असलेले प्रश्न मार्गी लावत असतानाच प्रकल्प पुर्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. गोसीखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन संदर्भातील काही प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अपर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे कोकणात सुरु असलेले प्रकल्प, मागील काळात त्यामध्ये आलेले अडथळे याबाबतही सविस्तर चर्चा झाली. त्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

राज्यातील ओलीत क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न –
जलसंपदा विभागाअंतर्गत सुरु असलेल्या राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेवून, त्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून ते पूर्ण करण्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्यामुळे येत्या तीन-चार वर्षात हे प्रकल्प पूर्ण होऊन राज्यातील ओलीत क्षेत्र वाढेल असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मानवतेच्या दृष्टीकोनातून प्राधान्याने पूर्ण करावा अशी सूचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.
यावेळी गोसीखुर्द राष्टीय प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई व कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माटे यांनी संगणकीय सादरीकरण करुन येथील प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Further action should be taken immediately to complete the gosikhurd national project cm thackeray

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या