मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील ‘गब्बर’ अर्थात शिखर धवन लवकरच बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डबल एक्सेल’ या चित्रपटातून शिखर धवन अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीने समाज माध्यमावर टाकलेल्या चित्रपटातील छायाचित्रामुळे शिखर धवनही या चित्रपटात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> “चित्रपट असो किंवा लग्न मुलगी कायम… ” हुमा कुरेशीने खंत व्यक्त केली

Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

हेही वाचा >>> बॉलिवूडमधील डावपेच, २ वर्षे डिप्रेशन अन्… नरगिस फाखरीने सांगितला वेदनादायी अनुभव

सध्या हिंदी चित्रपटातही वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. चित्रपटाच्या नावातूनच याचा विषय जाहीर होत आहे. आयुष्यात भव्य काही तरी करू इच्छिणाऱ्या दोन तरुणींना त्यांच्या जाडेपणामुळे सतत नाकारले जाते, असा विषय ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात रंगवण्यात आला आहे. हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आता क्रिकेटपटू शिखर धवनची झलकही प्रोमोमध्ये दिसली आहे. प्रोमोमधून तरी शिखर धवन त्याचे मूळ नाव आणि ओळखीसह चित्रपटात दिसणार असल्याचे जाणवते. मात्र खरोखरच त्याची यात पाहुणा कलाकार म्हणू भूमिका आहे की तो महत्वाची व्यक्तिरेखा साकारणार आहे हे अजून निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. क्रिकेटचे मैदान गाजवणारा शिखर रुपेरी पडदाही गाजवणार का?, याची उत्सूकता चाहत्यांना लागली आहे.

हेही वाचा >>> पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

४ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार

‘डबल एक्सएल’ चित्रपटाचे चित्रीकरण भारत आणि यूकेमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या दोन्ही अभिनेत्रींनी १५ ते २० किलो वजन वाढवले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रामानी यांनी केले असून निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, साकिब सलीम, हुमा कुरेशी यांनी केली आहे. हा चित्रपट सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘वजनदार’ या मराठी चित्रपटाचा रिमेक असल्याचीही चर्चा आहे. मात्र यातला जाडेपणामुळे समाजाकडून केली जाणारी चेष्टा, मिळणारी दुय्यम वागणूक हा समान धागा सोडला तर दोन्ही चित्रपटांचे कथानक वेगळे आहे. शिवाय, रिमेकच्या चर्चांना निर्मात्यांनी फारसे महत्त्व दिले नसल्याने अजूनही याबाबतीतला गोंधळ कायम आहे.