मराठी चित्रपटसृष्टीतील काही सिनेमे सुरुवातीपासूनच उत्सुकता वाढविण्याचे काम करतात. मराठी सिनेसृष्टीची हीच परंपरा जपत आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गल्ली नं. १३’ हे या चित्रपटाचे शीर्षक असून त्याचे पहिलेवहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.
या चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शन प्रसंगी ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, समाधान बोडके पाटील, युवराज आप्पा कोठुळे, नवनाथ नाना कोठुळे, दिलीप चव्हाण, शिवाजी कसबे, भैरू पाटील मुळाने, निर्माते रामनाथ बोडके, निर्मात्या राजश्री बडगुजर, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर, पिकल एन्टरटेन्मेंटचे समीर दीक्षित, लेखक डॉ. एस. डी. पाटील, संगीतकार रोहित नागभिडे यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
आरबी सिनेमॅटिक्सने पिकल एन्टरटेन्मेंटच्या साहाय्याने ‘गल्ली नं. १३’ची प्रस्तुती केली आहे. निर्माते रामनाथ बोडके आणि राजश्री बडगुजर या चित्रपटाचे निर्माते आहेत. निर्माते राम बोडके हे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून आरबी सिनेमॅटिक्स अंतर्गत ही त्यांची पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, पटकथा व संवादलेखन महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे. दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी मराठी आणि हिंदी भाषांमधील बऱ्याच मालिकांचे लेखन केले आहे.
‘गल्ली नं. १३’ ही गोष्ट तरुणाईची असून यात कुटुंबसंस्था आणि आताच्या समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकणारे पैलूही पाहायला मिळणार आहेत. आताच्या जेन झी पिढीपासून ते ज्येष्ठांपर्यंत निखळ प्रेमाच्या विविध परिभाषा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न असल्याचे मत दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी व्यक्त केले आहे.
या चित्रपटाची कथा डॉ. एस. डी. पाटील यांची आहे. संगीतकार रोहित नागभिडे आहेत. नृत्य दिग्दर्शन प्रज्ञा पाटील करणार असून एपीएच स्टुडिओ पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी सांभाळणार आहे.
