Hit & Run Accident in Mumbai: मुंबईत एकीकडे गणरायाच्या आगमनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा आज पहाटे ४ च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एका कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. या कार्यकर्त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नसून एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

कारचालकाचा शोध सुरू

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास हे दोघे बाईकवरून जात असताना त्यांना एका भरधाव कारनं धडक दिली. ही घटना घडल्यानंतर कारचालकानं घटनास्थळावरून पोबारा केला. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करून घेतला असून लागलीच कारचालकाचा शोध सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई व उपनगरांत घडलेल्या हिट अँड रनच्या घटना चर्चेत असतानाच या नव्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…