भोईवाडा विभाग- वाहतूकीस बंद रस्ते:-

१ ) गोविंदजी केणी मार्ग-माने मास्तर चीक (भोईवाडा नाका) ते हिंदमाता जंक्शन दरम्यानचा मार्ग बंद राहिल. पर्यायी मार्ग -सदर मार्गावरील वाहतूक जी डी आंबेकर मार्गाने शंकरराव घाडगे मास्तर चौक व डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाने बी जे देवरूखकर मार्गावर वळविण्यात येईल.

२) मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय/नायगाव कॉस रोड हा मार्ग रणजित बुधकर चौक ते सरफरे चौक दरम्यानचा रस्ता एकदिशा मार्ग असेल. तेथे सरफरे चौक ते रणजित बुधकर चौकाकडे येण्यास मनाई राहील. पर्यायी मार्ग-सरफरे चौकाकडून रणजित बुधकर चौकाकड/डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाकडे येणारी वाहतूक जी डी आंबेकर मार्गाने अलबेला हनुमान मंदिर चौक (राम मंदिर चौक) येथुन लोकमान्य टिळक मार्गाने डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाकडे जाईल.

३) आचार्य दोंदे मार्ग (केईएम रोड) हा परेल टि टि जंक्शन ते खानोलकर चौका दरम्यान एकदिशा मार्ग राहील. खानोलकर चौकाकडून परेल टीटी जंक्शनकडे जाण्यास मनाई राहील. पर्यायी मार्ग- डॉ अर्नेस्ट बोर्जेस मार्गाने सुपारीबाग जंक्शन / डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाकडे वळविण्यात येईल.

हेही वाचा >>> मुंबई : अनंत चतुर्दशीला वीस हजारांहून अधिक पोलिसांचा शहरभर बंदोबस्त

वरळी वाहतूक विभाग

एक दिशा मार्ग :-

१) डॉ. अॅनी बेझंट रोड- दक्षिण वाहीनीवरून हाजीअलीकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वरळी नाका जंक्शन येथे बंद करण्यात येईल. वाहतूक डॉ ई मोझेस रोडवरून महालक्ष्मी रेल्वे जंक्शनवरून केशवराव खाडे मार्गावरून हाजीअलीकडे वळविण्यात येईल.

२) ना.म. जोशी मार्ग लालबागचा राजा बी. ए. रोड उत्तर वाहिनीवरून भारतमाता जंक्शन येथे मिरवणुक येण्यापुर्वी शिंगटे मास्तर चौक येथुन भारतमाता जंक्शनकडे जाणारी वाहतुक ही तात्पुरती बंद करण्यात येईल.

३) ना.म. जोशी मार्ग लालबागचा राजा चिंचपोकळी जंक्शन दक्षिण वाहीनीवरून चिंचपोकळी जंक्शन पास झाल्यानंतर शिंगटे मास्तर चौक येथून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येईल.

वाहने उभी करण्यास बंदी :-

१) डॉ. अॅनी बेझंट रोड जुने पासपोर्ट कार्यालय ते लोटस जंक्शन पर्यंत

२) आर. जी. थडाणी मार्ग:-पोद्दार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदु माधव ठाकरे चौक.

३) ना.म. जोशी मार्ग: आर्थर रोड नाका ते शिंगटे मास्तर चौक

दादर वाहतूक विभाग

वाहतूकीस बंद रस्ते :-

१) स्वातंत्रवीर सावरकर मार्ग :- दक्षिण वाहिनीवरील वाहतुक ही येस बँक सिग्नल येथून श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन पर्यंत बंद राहील. सदर मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरील वाहतुक येस बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडुरंग नाईक मार्गे राजाबडे चौक – तेथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड – गोखले रोडने दक्षिण मुंबईकडे ईच्छित स्थळी जातील.

स्वातंत्रवीर सावरकर मार्गाची उत्तर वाहिनी श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन येथून येस बँक जंक्शनपर्यंत फक्त गणपती विसर्जन मिरवणुकांकरीता शिवाजीपार्क चौपाटी येथे जाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली अाहे. श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन येथून उत्तर वाहिनीने मार्गक्रमण होणारी वाहतुक ही दक्षिण वाहिनीने माहिमच्या दिशेने मार्गक्रमण होईल.

हेही वाचा >>> मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

२) रानडे रोड :- रानडे रोड हा पानेरी जंक्शन येथून चैत्यभुमी जंक्शनपर्यंत (स्वांतत्रवीर सावरकर मार्ग) बंद राहील.

पर्यायी मार्ग :- कोतवाल गार्डन सर्कल येथून एन सी केळकर मार्गे येणारी वाहतुक ही हनुमान मंदिर सर्कल येथे उजवे वळण घेवून एस. के. बोले रोड मार्गे पोर्तुगिज चर्च येथे येवून गोखले रोड मार्गे ईच्छीत स्थळी मार्गक्रमण करतील.

३) संत ज्ञानेश्वर मंदिर रोड चैत्यभुमी जंक्शन (स्वांतत्रवीर सावरकर मार्ग) ते चैत्यभुमी गणेश विसर्जन चौपाटी पर्यंत बंद राहिल. फक्त विसर्जन मिरवणुक आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना परवानगी असेल.

४) जांभेकर महाराज मार्ग सुर्यवंशी हॉल चौपाटी, द. स. बाबरेकर मार्ग ते चैत्यभूमी चौपाटी, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड यांना जोडणारा मार्ग आवश्यकतेनुसार बंद राहिल.

५) केळूस्कर रोड दक्षिण मार्ग बंद

पर्यायी मार्ग :- केळुस्कर रोड दक्षिण सिग्नल येथे येवून उजवे वळण घेवून स्वांतत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनीने यस बँक जंक्शन येथे उजवे वळण घेवून पांडुरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड, गोखले रोडचा वापर करुन ईच्छीत स्थळी जातील.

६) केळूरकर रोड उत्तर मार्ग बंद

पर्यायी मार्ग :- दिलीप गुप्ते रोडने पिंगे चौक येथे उजवे वळण घेवून पांडुरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड, गोखले रोडचा वापर करुन ईच्छीत स्थळी जातील.

७) एम. बी. राऊत रोड बंद

पर्यायी मार्ग :- दिलीप गुप्ते रोडने पिंगे चौक येथे उजवे वळण घेवून पांडुरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड, गोखले रोडचा वापर करुन ईच्छीत स्थळी जातील.

८) टिळक उडड्राणपुल: कोतवाल गार्डन सर्कल येथून दादर टी टी सर्कलपर्यंत बंद

पर्यायी मार्ग : एलफिस्टन ब्रिज तसेच धारावी टी जंक्शन यांचा वापर करून ईच्छीत स्थळी मार्गक्रमण होतील.

एक दिशा मार्ग कोणते …

१) बाळ गोविंददास रोड जे. के. सावंत मार्ग ते एल. जे. रोड पर्यंत

पर्यायी मार्ग :- एल जे रोड ते जे. के. सावंत मार्गावर येणारी वाहतुक ही मनोरमा नगरकर मार्गाचा वापर करुन ईच्छीत स्थळी मार्गक्रमण करतील.

२) एस. के. बोले रोड एस. के. बोले रोड हा श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन ते पोर्तुगिज चर्च जंक्शनपर्यंत आवश्यकते नुसार एक दिशा मार्ग. पोर्तुगिज चर्च जंक्शन येथून श्री सिध्दीविनायक जंक्शनपर्यंत बंद

पर्यायी मार्ग :- एस. के. बोले रोड मार्गे पोर्तुगिज चर्च जंक्शन येथून श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन मार्गे जाणारी वाहतुक ही गोखले रोड दक्षिण वाहिनीने पुढे मार्गक्रमण होवून जाखादेवी जंक्शन येथे उजवे वळण घेवून शंकर घाणेकर मार्गे लेनिनग्राड जंक्शन मार्गे आप्पासाहेब मराठे मार्गे दक्षिण मुंबईकडे मार्गस्थ होतील.

वाहने उभी करण्यास बंदी.

१) स्वातंत्रविर सावरकर मार्ग

२) केळुसकर रोड दक्षिण

३) केळुसकर रोड उत्तर

४) एम.बी. राऊत मार्ग

५) शिवाजी पार्क रोड नं. ५:- पांडूरंग नाईक मार्ग हा स्वातंत्रविर सावरकर मार्ग ते राजाबडे चौकापर्यंत.

६) रानडे रोड :- एन.सी. केळकर रोड ते चैत्यभूमी जंक्शनपर्यंत.

७) ज्ञानेश्वर मंदीर रोड सुर्यवंशी हॉल चौपाटी ते चैत्यभूमीपर्यंत.

८) जांभेकर महाराज मार्ग :- चैत्यभूमी ते सुर्यवंशी हॉल चौपाटीपर्यंत.

९) एस. के. बोले मार्ग :- पोर्तुगीज चर्च ते सिध्दिविनायक मंदीर

माहिम वाहतूक विभाग

वाहतूकीसाठी बंद रस्ते :-

१) टी. एच. कटारिया मार्ग (माटुंगा लेबर कॅम्प रोड):- कुंभारवाडा जंक्शन टाटा पॉवर हाऊस- माटुंगा रेल्वे कारखाना- कटारिया ब्रिज- गंगाविहार जंक्शन- शोभा हॉटेल जंक्शनपर्यत (दोन्ही बॉन्ड)

पर्यायी मार्ग- १) सायन हॉस्पीटल कडून येणारी वाहतूक कुंभारवाडा जंक्शन येथून ६० फुट रोडने केमकर चौक येथे उजवे वळण घेवून टी जंक्शन मार्गे इच्छित स्थळी मार्गक्रमण करतील. २) कुंभारवाडा जंक्शन येथून हलकी वाहने उजवे वळण घेवून ९० फुट रोडने अशोक मिल नाका डावे/उजवे वळण घेवून इच्छित स्थळी मार्गक्रमण करतील. ३) माहिम व सेनापती बापट मार्गावरून धारावी ६० फुट रोडकडे जाणाऱ्या वाहनांकरीता मोरी रोड, माहिम जंक्शन उजवे वळण माहिम कॉजवे मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.

२) माहिम सायन लिंक रोड (रहेजा ब्रिज): केमकर चौक ते रहेजा हॉस्पीटल जंक्शन उतरणीपर्यत

पर्यायी मार्ग :-१) ६० फुट नॉर्थ बॉन्डने येणारी वाहतूक केमकर चौक येथून उजवे वळण घेवून टी. जंक्शन मार्गे इच्छित स्थळी मार्गक्रमण करतील. २) धारावी व कुर्ला कडून माहिमकडे केमकर चौक मार्गे येणारी वाहतूक ही टी. जंक्शन येथे उजवे वळण घेवून कलानगर जंक्शन येथून डावे वळण घेवून माहिम कॉजवे मार्गे इच्छितस्थळी मार्गक्रमण करतील. ३) माहिम व सेनापती बापट मार्गावरून धारावी ६० फुट रोडकडे जाणाऱ्या वाहनांकरीता मोरी रोड, माहिम जंक्शन उजवे वळण माहिम कॉजवे मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.

वाहने उभी करण्यास बंदी:-

१) जन. ए. के. वैदय मार्ग:- माहिम कॉजवे, कोळी पुतळा, माहिम जंक्शन पर्यत (दोन्ही बाजूस)

२) एल. जे. रोड- माहिम जंक्शन, शितलादेवी जंक्शन, शोभा हॉटेल, राजा बढे चौक पर्यत (दोन्ही बाजूस )

३) मोरी रोड :- माहिम जंक्शन ते माहिम फाटक पर्यंत (दोन्ही बाजूस)

४) टि.एच. कटारिया मार्ग (माटुंगा लेबर कॅम्प रोड): कुंभारवाडा जंक्शन टाटा पॉवर हाऊस- माटुंगा रेल्वे कारखाना कटारिया ब्रिज- गंगाविहार जंक्शन शोभा हॉटेल जंक्शन-आसावरी जंक्शन पर्यत (दोन्ही बाजूस)

५) ६० फुट रोड- कुंभारवाडा जंक्शन, धारावी फाटक, केमकर चौक पर्यत (दोन्ही बाजूस)

६) सायन माहिम लिंक रोड- केमकर चौक रहेजा ब्रिज- रहेजा हॉस्पीटल जंक्शन पर्यत (दोन्ही बाजूस) ७) एस.एल. रहेजा मार्ग एस. एल. रहेजा हॉस्पीटल जंक्शन सेनापती बापट मार्ग-माहिम फाटक (दोन्ही बाजूस)

माटुंगा वाहतूक विभाग

वाहतूकीस बंद रस्ते :-

१) टिळक ब्रिज :- खोदादाद सर्कल (दादर टी.टी.) ते कोतवाल गार्डनपर्यंत बंद

पर्यायी मार्ग : दादर टी.टी. जंक्शन येथून डॉ. बी.ए. रोड सरळ परेल टी.टी. जंक्शन येथून उजवे वळण घेवून एलफिन्स्टन ब्रिज मार्गे पुढे इच्छीत स्थळी जातील किवा सायन हॉस्पीटल जंक्शन मार्गे धारावी मार्गे पुढे इच्छीत स्थळी जातील.

२) मणकीकर मार्ग : डंकन क्वॉजवे ते सायन तलावापर्यंत.

पर्यायी मार्ग :- डंकन क्वाजवे जंक्शन हायवे अपार्टमेन्ट येथुन सरळ डॉ. बी.ए. रोड उत्तर वाहीनीवरून गुलमोहर रोडने पुढे इच्छीत स्थळी जातील.

३) डॉ. बी.ए. रोड : महेश्वरी उदयान ते सुपारीबाग जंक्शन पर्यंत दक्षिण वाहिनी वाहतूकीस बंदी राहील.

पर्यायी मार्ग : महेश्वरी सर्कल डावे वळण चार रस्ता आरे किडवाई मार्गने इच्छित स्थळी जातील.

एक दिशा मार्ग :-

१) मणकीकर मार्ग :- सायन जंक्शन ते चुनाभ‌ट्टीपर्यंत बंद

२) टिळक मार्ग दादर टी.टी. जंक्शन ते कोतवाल गार्डनपर्यंत बंद

३) डॉ. बी.ए. रोड :- महेश्वरी उदयानपासून सुपारीबाग जंक्शनपर्यंत दक्षिणेस जाणाऱ्या वाहतूकीस बंद राहील. (दक्षिण वाहीनी ही उत्तेरकडे जाणाऱ्या वाहतूकीसाठी वापरण्यात येईल आणि उत्तर वाहीनी ही गणपती मिरवणुकीसाठी खुली राहील.)

वाहने उभी करण्यास बंदी :-

१) डॉ. बी.ए. रोड :- महेश्वरी उदयानपासून सुपारीबाग जंक्शनपर्यंत दोन्ही वाहिनीवर वाहने उभी करण्यास बंदी

कुर्ला वाहतूक विभाग

वाहतूकीस बंद रस्ते :-

१ ) एल.बी.एस. रोड : कमानी जंक्शन ते कुर्ला डेपोपर्यंत उत्तर वाहिनी बंद राहील.

पर्यायी मार्ग :-  कुर्ला डेपो येथून घाटकोपर कडे जाणारी वाहने ही एस.सी.एल.आर. मार्ग अलबरकत स्कूल येथून डावे वळन घेवून विद्याविहार रोड कोहिनूर सिटी मार्ग हॉलिक्रॉस स्कूल येथे उजवे वळन घेवून – प्रिमियर रोडने पुढे इच्छित स्थळी जातील

२) कुर्ला डेपो येथून साकिनाक्याकडे जाणारी वाहने ही कल्पना जंक्शन येथून डावे वळण घेवून एअर इंडिया रोडने पुढे इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग :- चिकणे चौक येथून सहारा जंक्शन कडे येणारी वाहणे हि बेलग्रामी जंक्शन येथून उजवे वळण घेवून एल.बी.एस. मार्गावरून पुढे त्यांचे इच्छित स्थळी जातील.

३) न्यु मिल रोड :- चिकने चौक ते सहारा जंक्शन उत्तर वाहीनी पर्यंत बंद राहील.

पर्यायी मार्ग – सहारा जंक्शन कडून चिकणे चौकाकडे जाणारी वाहने हि एल.बी.एस. मार्गावरून कुर्ला डेपो जंक्शन, सुर्वे जंक्शन येथून पुढे त्यांचे इच्छित स्थळी जातील.

वाहने उभी करण्यास बंदी :-

१) एल.बी.एस. रोड २) न्यू मिल रोड