पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील सहा जणांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे पावणेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा- मुंबई : कांदिवलीमध्ये घरफोडी; १४ लाखांचा मुद्देमाल लूटला

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

ठाणे परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराची काही दिवसांपूर्वी या टोळीतील एका आरोपीसोबत ओळख झाली होती. तक्रारदाराकडून २५ लाख रुपये घेऊन त्याला ७५ लाखांच्या बनावट नोटा देण्याचे अमिष आरोपीने दाखविले होते. तक्रारदार २५ नोव्हेंबर रोजी २५ लाख रुपये घेऊन घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालय परिसरात पोहोचला होता. आरोपींनी तक्रारदारकडून २५ लाख रुपयांची बॅग घेतली आणि पोलीस आल्याचा बहाणा करून २५ लाख रुपयांसह पोबारा केला.

हेही वाचा- मुंबई: विलेपार्ले स्टुडिओ घोटाळ्यात अखेर महापालिकेची कारवाई

याप्रकरणी तक्रारदाराने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ताब्यात घेतली. त्यानंतर पोलिसांनी अर्षद खान (३२), अल्ताफ खान (२५), अकबर शेख (५०), नईम शेख (४३), इम्तियाज खान (३२) आणि रवींद्र खंडागळे (५२) या सहा जणांना घाटकोपर येथून अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून रोख पाच लाख २३ हजार रुपये, एक रिक्षा आणि दोन दुचाकी असा एकूण सहा लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अन्य एका आरोपीचा शोध घेत आहेत.