scorecardresearch

दाऊदचा विश्वासू सहकारी रियाझ भाटीला अटक; खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई

रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचे नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी मोटारगाडी आणि ७ लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळली होती.

दाऊदचा विश्वासू सहकारी रियाझ भाटीला अटक; खंडणीप्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई
दाऊदचा विश्वासू सहकारी रियाझ भाटीला अटक

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आणि गँगस्टर रियाझ भाटीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अंधेरीतून अटक केली. त्याच्याविरुद्ध खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात छोटा शकीलचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- बंगल्यावर कारवाई अटळ ; नारायण राणे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

व्यवसायिकाकडून उकळले होते ७ लाख रुपये

रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचे नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी मोटारगाडी आणि ७ लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळली होती. त्यानंतर व्यावसायिकाने याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास करणाऱ्या गुन्हे शाखेला भाटी अंधेरी परिसरात असल्याची माहिती सोमवारी मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. भाटी याच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले. त्याला मंगळवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणीतील आरोप असलेला सलीम फ्रुटला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या