विक्रोळीत शनिवारी रात्री एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

विक्रोळीच्या सूर्या नगर परिसरात शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास राहणाऱ्या सुजाता कवळे (वय ३०) यांच्या घरी ही घटना घडली. याठिकाणी अचानक गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर घराच्या भिंती आणि पोटमाळ्यासह शेजारील घरांचे देखील पत्रे तुटले आहेत.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

हेही वाचा: एकवीरा देवस्थानच्या घटनेची प्रत गहाळ झाल्याचे निदर्शनास का आणून दिले नाही?; उच्च न्यायालयाचे सरकार, धर्मादाय आयुक्तांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

स्फोटानंतर स्थानिक रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन, सुजाता यांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. सुजाता या ८० टक्के भाजल्या असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.