मुंबई : क्षयरोग रुग्णांमध्ये औषध प्रतिरोधकता वाढू लागल्याने अनेक रुग्णांना बरे होण्यास विलंब लागत आहे. मात्र जनुकीय क्रमनिर्धारण उपचार पद्धत ही क्षयरोग रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, औषध प्रतिरोधकातील बदल समजून घेण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

क्षयरोग हा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा संसर्गजन्य रोग आहे. भारतात २०२० मध्ये क्षयरोगाचे २.९५ दशलक्ष रुग्ण सापडले, यापैकी १ लाख ३५ हजार रुग्ण बहु-औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे होते. क्षयरोगावरील उपचार दीर्घकाळ चालणारे आणि त्रासदायक असल्याने अनेक रुग्ण ते अर्धवट सोडतात. त्यामुळे बहु-औषध प्रतिरोधक रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशा रुग्णांवर पुन्हा उपचार करणे अवघड होते. या रुग्णांवरील उपचारासाठी जनुकीय क्रमनिर्धारण ही उपचार पद्धती महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि आयआयटी मुंबईची जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत कार्य करणारी हेस्टॅक ॲनालिटिक या जीनोमिक्स डायग्नोस्टिक सोल्यूशन्स संस्थेने केले आहे.

food and drugs police uniform marathi news
अन्न व औषध प्रशासनातही पोलिसांप्रमाणे गणवेश? राज्य शासनाला प्रस्ताव सादर
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
lok sabha election 2024 mns ignore toll issue after alliance with mahayuti
‘इंजिन’ची दिशा बदलताच मनसेला पथकराचा विसर 
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
mahayuti seals seat sharing pact in maharashtra
महायुतीतील पेच दूर; ठाणे, नाशिकमध्ये शिवसेनेचेच उमेदवार, भाजपच्या वाटयाला २८ मतदारसंघ, शिंदेंना १५ तर अजित पवार गटाकडे ४ जागा
Congress MLA Raju Kage
“उद्या जर नरेंद्र मोदीचं निधन…” कर्नाटकमधील काँग्रेस आमदाराचे खळबळजनक विधान
Mumbai North development promise by BJP Piyush Goyal
मोदी हमीने ‘उत्तर मुंबई’चा गतीने विकास – पियूष गोयल यांचे प्रतिपादन
mira bhaindar riot case marathi news, mira bhaindar violence marathi news
मिरा-भाईंदर येथील दंगलीनंतरचे प्रक्षोभक भाषणाचे प्रकरण : आमदार नितेश राणे आणि गीता जैनविरोधात गुन्हा

हेही वाचा : गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

वाढत्या क्षयरोगाबाबत डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि हेस्टॅक ॲनालिटिक यांनी केलेल्या संशोधनामध्ये ६०० औषध-प्रतिरोधक क्षय रुग्णांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण केले. यामध्ये क्षयरोगासाठी प्रतिजैविक म्हणून पहिल्या टप्प्यातील रिफॅम्पिसिन, आयसोनियाझिड आणि श्वसन आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी दिल्या जाणाऱ्या फ्लूरोक्विनोलोन या औषधांना प्रतिरोध होत असल्याचे आढळून आले. तर पूर्व औषध प्रतिरोधक क्षय (प्री एक्सडीआर टीबी) हे ५०.८३ टक्के रुग्णांमध्ये तर औषध प्रतिरोधक क्षय (एमडीआर-टीबी) १५.५ टक्के रुग्णांमध्ये आढळून आले. तसेच १५ ते ३५ वयोगटातील ५५ टक्के, तर १४ वर्षे वयोगटातील ६७ टक्के रुग्णांमध्ये एक्सडीआर क्षय आढळून आला. बेडाक्विलिनसारख्या नवीन औषधांनाही प्रतिकार होत असल्याने जनुक्रिय क्रमनिर्धारणसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार

अचूक निदान, वैयक्तिक उपचार पद्धती आणि औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचा सामना करण्यासाठी डॉक्टरांकडून संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण उपचाराचा वापर हा अभ्यास अधोरेखित करतो. तसेच डॉक्टर आणि रूग्णांना प्रगत तंत्रज्ञानाचा तर्कशुद्ध वापर आणि योग्य क्षय उपचार पद्धतींबद्दल शिक्षित करण्यास वाव मिळत असल्याचे हेस्टॅक ॲनालिटिक्सचे सीईओ सह-संस्थापक डॉ. अनिर्वन चॅटर्जी यांनी सांगितले.