मुंबई : घाटकोपरमध्ये सोमवारी झालेल्या दुर्घटनेने १४ जणांचा बळी घेतल्यानंतर पालिका प्रशासनाला महाकाय होर्डिंगबाबत जाग आली आहे. परवाना न घेता लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी दिले. दुसरीकडे रेल्वेच्या हद्दीत असलेले अजस्त्र ९९ फलक हटविण्याबाबत महापालिकेने नोटीस दिली. मुंबईप्रमाणेच ठाणे, पुण्यातील स्थानिक प्रशासनांनीही अजस्त्र जाहिरात फलकांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

छेडानगर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा मंगळवारी १४ झाला आहे. मंगळवारी गगराणी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्त म्हणाले, की महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. विनापरवाना तसेच धोकादायक स्थितीतील फलकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी असलेल्या अन्य तीन अनधिकृत फलक हटविण्यात आल्याचे ते म्हणाले.

dcm devendra fadnavis slams uddhav thackeray
मराठी माणूस मुंबईबाहेर का गेला, याचे उद्धव यांनी उत्तर द्यावे; वरळीतील सभेत देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
narendra modi road show in ghatkopar
मोदी यांचा केवळ घाटकोपरमध्येच ‘रोड शो’; शिंदे गटाच्या उमेदवारांची मागणी अमान्य
lok sabha election 2024 sharad pawar criticizes pm modi for injustice with maharashtra
मोदींच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रावर अन्याय; शरद पवार यांची टीका; कांजूरमार्ग येथे प्रचारसभा
controversy over chhatrapati shivaji maharaj s jiretop on modi head
मोदींच्या जिरेटोपावरून नव्या वादाला तोंड; छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची प्रफुल पटेलांवर टीका
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”
Raj and uddhav
राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय? नारायण राणेंनी भरसभेत सांगितला दोघांचाही स्वभाव; म्हणाले, “मी बऱ्याच वर्षांपासून…”

हेही वाचा >>> मोदींच्या जिरेटोपावरून नव्या वादाला तोंड; छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची प्रफुल पटेलांवर टीका

दुसरीकडे शहरातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या १७९ जाहिरात फलकांपैकी ९९ फलक ४० बाय ४० फुटांपेक्षा मोठे असून ते तत्काळ हटविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने रेल्वे प्राधिकरणाला दिले. हे फलक न हटवल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत पालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. रेल्वेच्या हद्दीतील एकाही जाहिरात फलकाला पालिकेची परवानगी घेतलेली नसून जाहिरात शुल्कही भरले जात नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई किती (पान २वर) फलक आहेत, कोणत्या प्राधिकरणाच्या हद्दीत किती फलक आहेत, किती फलक महाकाय आहेत, किती अनधिकृत आहेत याची माहिती मागवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. सर्वाधिक २२ महाकाय फलक शिवडी, नायगाव परिसरात असल्याची माहिती आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ९९ ठिकाणी १३८ लोखंडी जाहिरात फलक आहेत. त्यांचे अभियांत्रिकी विभागाकडून नियमितपणे संरचनात्मक परीक्षण केले जाते, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तर पश्चिम रेल्वेवरील ११६ ठिकाणी असलेल्या १३७ लोखंडी फलकांचे पावळ्याची पूर्वतयारी म्हणून संरचनात्मक परीक्षण सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

फलकांची छाया जीवघेणी

एकीकडे मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर कारवाई सुरू केली असताना अन्य महापालिकाही सावध झाल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात तीनशेच्या आसपास अधिकृत जाहीरात फलक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी त्यात नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या ९० फलकांकडे डोळेझाक होत असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार केवळ ८५ अनधिकृत जाहिरात फलक असल्याचे सांगण्यात आले आहे. २,५९८ अधिकृत जाहिरात फलकांपैकी २,२४९ फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही शहरातील १२०० अधिकृत होर्डिंगचे १५ दिवसांत पुन्हा नव्याने लेखापरीक्षण केले जाणार असल्याचे पालिका उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

जाहिरात संस्थेचा काळा इतिहास

घाटकोपर येथे महाकाय फलक उभारणाऱ्या जाहिरात संस्थेचे नाव काही वर्षांपूर्वी रेल्वेने काळ्या यादीत टाकले होते. संस्थेने पूर्वी ‘गुज्जू’ या नावाने कंत्राटे मिळवली होती. आता नाव बदलून हीच संस्था जाहिराती करत आहे. मुंबईत या संस्थेचे अनेक जाहिरात फलक असून दादरच्या टिळक पुलाच्या परिसरातही या कंपनीचे आठ मोठे फलक आहेत.

जमिनीची मालकी कुणाचीही असली तरी व्यवसायासाठी परवाना घेऊनच फलक लावणे बंधनकारक असेल. लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या जागेतील अनधिकृत फलक तसेच परवाना या मुद्द्यावर वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे.– भूषण गगराणी, मुंबई महापालिका आयुक्त