मुंबई : घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्यांच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या १० एप्रिलपासून दोन्ही कप्प्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दुरुस्ती कालावधीत पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता दुरुस्तीपूर्वीच्या वेळेप्रमाणेच १० एप्रिलपासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

नारायणनगर आणि झोन क्रमांक एनएक्स – ३ शी संबंधित चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट मार्ग, एनएसएस मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एस. मार्ग, खालाई गाव, किरोळ गाव, विद्याविहार (पश्चिम), हंसोटी गल्ली, खोत गल्ली, महात्मा गांधी मार्ग, नवरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, ध्रुवराजसिंह गल्ली, गोपाळ गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी या परिसरामध्ये दुरुस्ती कालावधीत पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ५ अशी होती. तसेच, रात्री १०.४५ ते ११.३० वाजता पाणीपुरवठा होत असे.

मात्र, आता दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५ अशी असेल. दरम्यान, पंतनगर आऊटलेट आणि झोन क्रमांक एनएक्स ०६ शी संबंधित भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राइम ब्रांच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सी. जी. एस. वसाहत, गंगावाडी, ध्रुवराजसिंह गल्ली, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) गल्ली, ए.जी.एल.आर. मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग ते श्रेयस सिग्नल आदी भागात दुरुस्ती कालावधीत पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.१५ ते रात्री १०.३० करण्यात आली होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित वेळापत्रकानुसार सायंकाळी ६.४५ ते रात्री ११ या वेळेत पाणीपुरवठा केला जाईल.

सर्वोदय बूस्टिंग आणि झोन क्रमांक एनएक्स ६ शी संबंधित सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, लाल बहादूर शास्त्री मार्गालगतचा परिसर घाटकोपर (पश्चिम), गांधीनगर या भागात दुरुस्तीदरम्यान सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ दरम्यान पाणीपुरवठा होत असे. त्यानंतर आता सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ या वेळेत पाणीपुरवठा सुरू राहील. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पुढील ५ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.