Ghatkopar West Assembly constituency Election 2024 : घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. भाजपाचे राम कदम हे येथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ साली हा मतदारसंघ तयार केल्यापासून राम कदम यांचा हा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ च्या निवडणुकीवेळी कदम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. त्यावेळी मनसेच्या तिकीटावर त्यांनी भाजपाच्या पूनम महाजन-राव यांचा २६ हजार मतांनी पराभव केला होता. साडेचार वर्षांनंतर ते भाजपात गेले. मागील १० वर्षांपासून ते भाजपात असून पक्ष त्यांना यावेळी पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरवू शकतो. तर महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. येथे अनेक शैक्षणिक संस्था, बाजारपेठा आणि निवासी भाग आहेत. या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेसचाही मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

हे ही वाचा >> जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, मविआतही संघर्ष! यंदा नवा आमदार मिळणार

हा विधानसभा मतदारसंघ राम कदम व भाजपाचा बालेकिल्ला असला तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत य मतदारसंघात भाजपाला आणि महायुतीला जोरदार फटका बसला होता. हा मतदारसंघ ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत घाटकोपर पश्चिम या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांना तब्बल ७९ हजार १४२ मतं मिळाली होती. तर भाजपाच्या कोटेचा यांना ६३ हजार मतं मिळाली होती. ही परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणूक कदम यांच्यासाठी सोपी नसेल.

हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?

राम कदम यांची वाट खडतर

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची युती तुटली होती. त्या निवडणुकीत कदम यांना ८०,३४३ मतं मिळाली होती. तर संयुक्त शिवसेनेच्या सुधीर मोरे यांना ३८,४२७ मतं मिळाली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत भाजपा व संयुक्त शिवसेनेची युती झाली आणि कदम यांना युतीकडून उमेदवारी मिळाली होती. तरीदेखील कदम यांची मतं कमी झालेली पाहायला मिळाली. कदम यांना २०१९ च्या निवडणुकीत ७०,२६३ मतं मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार संजय भालेराव यांना ४१,४७४ मतं मिळाली होती. त्यामुळे यंदा कदम यांना भाजपाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली तर कदम यांची वाट खडतर असेल.

हे ही वाचा >> Shirdi Assembly Constituency: शिर्डी विधानसभा: विखेंचा गड यंदा ढासळणार की शाबूत राहणार?

या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मराठी व गुजराती मतदार आहेत. यासह मुस्लीम व बहुजन मतदारांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे कोणत्याही एका गटाच्या मतांवर या मतदारसंघाची निवडणूक जिंकणं सोपं नाही.

तीन प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची लढत

घाटकोपर (पश्चिम) मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. मतदारसंघातून एकूण २३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ६ अर्ज बाद करण्यात आले आहे, तर. १३ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. शिवसेनेने (ठाकरे) येथून संजय भालेराव यांना, तर भाजपाने येथून राम कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यासह मनसेचे गणेश चुक्कल व वंचितचे सागर गवईदेखील मैदानात उतरले आहेत.

भाजपा-शिवसेनेत सामना, मनसेने रंगत वाढवली

या मतदारसंघात भाजपाचे राम कदम विरुद्ध शिवसेनेचे (ठाकरे) संजय भालेराव यांच्यात कडवा सामना रंगणार असला तरी मनसेने यात उडी घेतल्यानंतर या लढतीची रंगत वाढली आहे. मनसेचाही या मतदारसंघात मोठा मतदारवर्ग आहे. मनसेमुळे आजवर शिवसेनेचं नुकसान झालं असलं तरी यावेळी मनसेचा भाजपालाच फटका बसू शकतो. तर काँग्रेसच्या साथीने ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Story img Loader