ठाणे महोत्सवात होणार गुलाम अलींचा कार्यक्रम

गुलाम अलींनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी टि्वटरवरुन दिली.

Gulam Ali Concert, ज्येष्ठ गझल गायक गुलाम अली

प्रसिध्द पाकिस्तानी गझल सम्राट गुलाम अलींचा फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा कार्यक्रम होईल. गुलाम अलींनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी टि्वटरवरुन दिली. दरम्यान, आव्हाडांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी गुलामअलींना ठाण्यात बोलावूनच दाखवावे असे आव्हान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आव्हाडांना दिले आहे. तर, शिवसेनेला जे करायचय ते करु दे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे
पाकिस्तानी कलाकरांचे महाराष्ट्रात कार्यक्रम आयोजित करण्यास शिवसेनेचा प्रखर विरोध असून, मागच्यावर्षी शिवसेनेच्या विरोधामुळे गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करावा लागला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ghulam ali to perform in thane festival after last yearss cancellation

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या