पाच वर्षांच्या मुलीवर चुलत भावाकडून बलात्कार

अंधेरीच्या डी. एन. नगरमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी तिच्या १७ वर्षीय चुलत भावाला पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त झाले होते.ही पाच वर्षांची मुलगी डी. एन. नगरमध्ये आपल्या आई-वडिलांबरोबर राहात होती.

अंधेरीच्या डी. एन. नगरमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी तिच्या १७ वर्षीय चुलत भावाला पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त झाले होते.ही पाच वर्षांची मुलगी डी. एन. नगरमध्ये आपल्या आई-वडिलांबरोबर राहात होती. अचानक ४ जुलै रोजी तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीत तपासणीत डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी तात्काळ डी. एन. नगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तिच्या घराच्या आसपास अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या १७ वर्षांच्या चुलत भावाचीही चौकशी केली असता तो काही तरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Girls five years raped by cousin brother in andheri

ताज्या बातम्या