बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २०२१-२२ करीता दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी, बी.ई.एस.टी.वर्कर्स युनियनने बेस्ट उपक्रमाकडे केली आहे. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाप्रमाणेच अनुदान मिळावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> मुंबई : वृत्त वाहिनीच्या छायाचित्रकारावर गर्दुल्यांचा चाकू हल्ला
गेल्यावर्षी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २० हजार रुपये अनुदान देण्यात आले होते, तर तेवढेच अनुदान बेस्ट कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले होते. यंदाही पालिका कर्मचाऱ्यांएवढेच अनुदान दिवाळीपूर्वी देण्याची मागणी असल्याचे युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.