मुंबई :  महात्मा गांधी यांच्या १५३व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘ग्लोबल कलेक्टिबल्स ऑफ महात्मा गांधी थ्रू बँक नोट्स, कॉइन्स अ‍ॅण्ड स्टॅम्प्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. गांधीजींवरील आजपर्यंत जगभरातील १४४ देशांनी प्रसिद्ध केलेल्या स्टॅम्प, नाण्यांवर आधारित हे पुस्तक आहे. ‘मिंटेज वर्ल्ड’ने या पुस्तकाचे प्रकाशन केले असून संकल्पना ‘मिंटेज वर्ल्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल यांची आहे.  पुस्तकाची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि इतर संकेतस्थळांसह दुकानांमध्ये ते उपलब्ध आहे.   www.mintageworld.com वर देखील उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रान्स, जर्मनी, श्रीलंका, तुर्की, रशिया, इराक, इराण, अफगाणिस्तान,   इजिप्त, ब्राझील, बांगलादेश, केनिया, उत्तर कोरिया, क्यूबा, झेक प्रजासत्ताक आणि इतर अनेक देशांतील टपाल विभागांनी विविध आकार, तसेच सामग्रीमध्ये स्टॅम्प जारी केले होते. या सर्व तिकिटांच्या अग्रभागी किंवा मागील बाजूस महात्मा गांधीजींची प्रतिमा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global collectibles of mahatma gandhi through bank notes coins and stamps mahatma gandhi publication of a book ysh
First published on: 02-10-2022 at 01:40 IST