खळबळजनक : नालासोपाऱ्यात भरदिवसा सराफाची हत्या करून दुकान लुटले!

दुकानामधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन काही क्षणातच हल्लेखोर पसार झाले

नालासोपारा (पश्चिम) येथील साक्षी ज्वेलर्सवर या दुकानावर आज (शनिवार) सकाळी ११ वाजेच्या सुमारास दरोडा पडला. दोन हल्लेखोरांनी दुकानाचे मालक किशोर जैन यांची हत्या करून लाखोंचा ऐवज लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नालासोपारा (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एसटी डेपो रोडवर साक्षी ज्वेलर्स हे दुकान आहे. शनिवारी सकाळी दुकानाचे मालक किशोर जैन यांनी नेहमी प्रमाणे दुकान उघडले. सकाळची वेळ असल्याने दुकानात अन्य कर्मचारी नव्हते. जैन दुकानात पूजा करत असताना दोन अज्ञात व्यक्ती दुकानात शिरले. त्यांनी जैन यांच्याकडे लॉकरची चावी मागितली. मात्र जैन यांनी चावी देण्यास नकार दिला. त्यामुळे हल्लेखोरांनी जैन यांच्यावर चाकूने सपासप वार केले. लॉकर उघडता न आल्याने हल्लेखोर दुकानामधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन काही क्षणातच पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या किशोर जैन यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती –

दिवसाढवळ्या झालेल्या लूट आणि हत्येचा घटनेने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून हल्लेखोरांचा शोधासाठी विविध पथके रवाना झाली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. तर, नेमका कितीचा ऐवज लुटून नेला त्याची माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gold and silver shop looted by killing shopkeeper in nalasopara msr

ताज्या बातम्या