सोने तस्करीच्या आठ वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांनी हे सोने वेगवेगळ्या मार्गाने दडवून
आणले होते.
दुबई येथून इंडिगो विमानाने मुंबईत आलेल्या इर्शाद अब्दुल्ला या प्रवाशाच्या झडतीमध्ये २५ लाख, ३१ हजार ५४० रुपयांचे १ किलो सोने जप्त करण्यात आले. अन्य एका घटनेत रियाध येथून आलेल्या मोहंमदअन्सार हसन बापा या प्रवाशाकडून ११ लाख ७४ हजार ६३५ रुपये केमतीचे सोने जप्त करण्यात आले. दुबई येथून आलेल्या शफी या प्रवाशाकडून ६०५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १५ लाख ३१ हजार ५८१ रुपये इतकी आहे. बहारीन येथून आलेल्या अहमद झकेरिया या प्रवाशाकडून १ किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत २५ लाख ३१ हजार ५४० रुपये इतकी आहे.
नईमुल्ला बद्रुद्दीन (बहारीन येथून आलेला प्रवासी), दुबई येथून आलेला आणखी एक प्रवासी, अब्दुल गफूर मोगराल अब्दुल रहेमान, मोहंमद फैजल मोहंमद या प्रवाशांनीही दडविलेले काही किलो सोने जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत १ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे.