मुंबई: महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या दोन कारवायांमध्ये सुमारे १० किलोपेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वासहा कोटी रुपये आहे.

आखाती देशातून सोन्याची तस्करीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारावर डीआरआयने शनिवारी मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. त्यानुसार शारजा येथून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एका दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद उमर मोह हारून फजलवाला व फहिम सलीम वारेवरीया अशी त्यांची ओळख पटली आहे. दोघेही गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहेत. तपासणीत त्यांच्याकडे सुमारे आठ किलो सोने सापडले असून त्याची किंमत चार कोटी ९४ लाख रुपये आहे. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयने मुजदसर अयुब डोजकी याला ताब्यात घेतले. त्याने आरोपींना गुन्ह्यांत मदत केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही याप्रकरणी अटक करण्यात आली. मुजदसर हा गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे. फजलवाला व वारेवारा दोघेही १ जूनला शारजाला गेले होते. तेथून ते दोघेही सोने घेऊन आले होते. या प्रकरणामागे टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. 

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण

दुसऱ्या कारवाईत मिळालेल्या माहितीच्या आधारावर दुबईहून आलेल्या दाम्पत्याला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले. दाम्पत्यापैकी अफजल अबुबकर वल्लाह याच्याकडे सुमारे दोन किलो सोने सापडले. महिलांच्या ५६ पाकिटांमध्ये सोने लपवले होते. ते जप्त करण्यात आले असून सीमाशुल्क कायद्याअंतर्गत अफजल विरोधात गुन्हा दाखल करून डीआरआयने त्याला अटक केली. आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत एक कोटी २३ लाख रुपये आहे. याप्रकरणी डीआरआय  तपास करत आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबईतील सोन्याच्या तस्करीत वाढ झाली आहे.