‘दोन स्पेशल’ नाटकाचा आज सुवर्णमहोत्सवी प्रयोग

‘लोकसत्ता संपादक’ शिफारसीची मोहोर या नाटकावर उमटविण्यात आली होती.

अथर्व आणि मिश्री निर्मित ‘दोन स्पेशल’ या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग आज, बुधवारी विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. ह. मो. मराठे यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर आधारित असलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन यांचे आहे. ‘लोकसत्ता संपादक’ शिफारसीची मोहोर या नाटकावर उमटविण्यात आली होती.
चार महिन्यात या नाटकाचे पन्नास प्रयोग झाले असून नाटकात जितेंद्र जोशी, गिरिजा ओक, रोहित हळदीकर हे कलाकार आहेत. एनसीपीए प्रतिबिंब महोत्सव, एसएनडीटी राष्ट्रीय नाटय़ महोत्सवात या नाटकाची निवड झाली होती. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी या नाटकासाठी निस्वार्थीपणे मदत केली आणि नाटकाच्या जाहिरातीही केल्या, असे निर्माते संतोष काणेकर यांनी सांगितले. मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, मान्यवरांच्या तसेच रसिकांच्या भरघोस प्रतिसादामुळे हा पल्ला गाठल्याचे अभिनेते जितेंद्र जोशी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Golden jublie performance of two special drama

ताज्या बातम्या