scorecardresearch

नायगाव-वरळी बीडीडीवासीयांसाठी खुशखबर; तब्बल ४६० रहिवाशांना म्हाडाच्या घराची हमी

वरळी बीडीडी चाळीतील १८ आणि नायगाव बीडीडी चाळीमधील ४४२ पात्र रहिवाशांना सोमवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाने प्रस्तावित पुनर्वसन इमारतीतील कायमस्वरूपी घराची हमी दिली.

नायगाव-वरळी बीडीडीवासीयांसाठी खुशखबर; तब्बल ४६० रहिवाशांना म्हाडाच्या घराची हमी
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील १८ आणि नायगाव बीडीडी चाळीमधील ४४२ पात्र रहिवाशांना सोमवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाने प्रस्तावित पुनर्वसन इमारतीतील कायमस्वरूपी घराची हमी दिली. म्हाडा भवनातील गुलझारीलाल नंदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन सोडतीद्वारे प्रस्तावित पुनर्वसन इमारतीतील सदनिका क्रमांक, इमारत क्रमांक, मजला आदींची निश्चिती करण्यात आली.

हेही वाचा >>> Mumbai Water Cut : निम्म्या मुंबईत आज पाणी नाही

हेही वाचा >>> छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुटसह पाच अटकेत; दक्षिण मुंबईतील २५ कोटींची मालमत्ता बळकावल्याचा आरोप

नायगाव बीडीडी चाळीतील १२ बी, १३ बी, १४ बी, १५ बी, १६ बी, १९ बी , २२ बी या इमारतींमधील ४४२ पात्र रहिवासी आणि वरळी बीडीडी चाळ प्रकल्पातील सावली इमारतीतील १८ पात्र रहिवाशांना कायमस्वरूपी घराची हमी देण्यात आली आहे. या रहिवाशांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in वर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 10:22 IST

संबंधित बातम्या