संपूर्ण जगभरात आज ‘मदर्स डे’ साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘गुगल डुडल’तर्फेही आई आणि तिच्या मुलांतील नाते अनोख्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण आणि कलात्मकतेने एखादा विषय मांडण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुगलच्या होमपेजवर माणसाबरोबरच पशु-पक्ष्यांच्या जगात आई आणि मुलाचे नाते कसे असते, हे दाखविण्यात आले आहे. जंगलात राहणारे प्राणी असोत किंवा समाजात राहणारा माणूस असो, सर्वत्र आई आणि मुलांचे नाते किती प्रेमळ असते, याचे प्रत्ययकारी चित्रण गुगलच्या होमपेजवर पहायला मिळेल. तुम्ही गुगलचे होमपेज ओपन कराल तेव्हा गुगल या इंग्रजी शब्दातील ‘ओ’ या अक्षराचे मजेशीर पद्धतीने अॅनिमेशन करण्यात आले आहे. या ‘ओ’ अक्षरातून एक बदक तयार होते आणि ते आपल्या पिल्लाला पंखात सामावून घेते. त्यानंतर जंगली प्राणी, ससा असा प्रवास करत शेवटी मानवी समाजातील नात्याचे चित्रण करण्यात आले आहे.

लिंकवर जाण्यासाठी क्लिक करा.