scorecardresearch

Video: बेघर महिलांना आधार देणारी ‘उर्जा’; जाणून घ्या संघर्षमय प्रवास

गेली दहा वर्ष बेघर महिलांशी संबंधित प्रश्नांवर उर्जा संस्था काम करत आहे.

gosht asamanyanchi
बेघर महिलांना आधार देणारी उर्जा संस्था

आजही समाजातील काही भाग चूल आणि मूल या संकल्पनेपलीकडे महिलांना पाहत नाही. अशावेळी ही बंधनं जुगारून काही महिला घराबाहेर पडतात. नव्या शहरात, नव्या ठिकाणी त्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहतात. पण पुन्हा महिला म्हणून त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंच. अशावेळी या महिलांना आधाराची गरज असते. गेली दहा वर्ष अशा बेघर महिलांना हा आधार देण्याचं काम ‘उर्जा’ ही संस्था करत आहे.

ही संस्था सुरू करण्यामागे देखील एक संघर्ष आहे. हा संघर्ष संस्थेच्या सहसंस्थापिका दिपाली वंदना यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितला आहे. ‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक  करा.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 11:44 IST