Unique History of Urbanization: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात सध्या ऐतिहासिक संबंध-भारत आणि प्राचीन विश्व या प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. दीर्घकाळ सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनासाठी जगभरातील प्राचीन संस्कृतीमधील तब्बल ५००० वर्षे जुन्या पुरावस्तू मुंबईत दाखल झाल्या आहेत. येथील विविध अभ्यास दालनांचा फेरफटका मारला असता, जगातील कृषी संस्कृतीची सुरुवात आणि नागरिकरणाकडे सुरू झालेला प्रवास आणि नंतरचा जागतिक व्यापार हे सारं व्यवस्थित समजून घेता येतं. आजही आपल्या अर्थव्यवस्थेला कृषिप्रधान अर्थव्यवस्था असेच म्हणतात, त्याची ती सुरुवात होती. इथे आलेली ५००० वर्षांपूर्वीची खापरं सांगतात, नागरिकरणाचा इतिहास.
मुंबईतील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी गोष्ट मुंबईची ही मालिका आमच्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता.
