नौदलात सर्वात खालच्या स्तरातील नाविकांना रेटिंग्स म्हणतात. दुसऱ्या महायुद्धानंतर या रेटिंग्सने मुंबईत संप पुकारला होता. हा संप फक्त मुंबईभर नाही तर रॉयल इंडियन नेव्हीचे केंद्र असणाऱ्या देशभरातील ठिकाणांवर पोहोचला होता. आज पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कराची ते इंडोनेशियापर्यंत ही चळवळ पोहोचली होती. हा संप होण्यामागचं कारण आणि त्याचे पडसाद याबद्दल जाणून घेऊयात आजच्या भागातून…