गोवंडी आत्महत्या प्रकरण : कुटुंबप्रमुख शकीलने पत्नी व मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष | Govandi suicide case family head Shakeel killed his wife and children and concluded that he committed suicide m umbai print news amy 95 | Loksatta

गोवंडी आत्महत्या प्रकरण : कुटुंबप्रमुख शकीलने पत्नी व मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष

मृत शकीलविरोधात हत्येचा गुन्हा

गोवंडी आत्महत्या प्रकरण : कुटुंबप्रमुख शकीलने पत्नी व मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष
( प्रतिनिधिक छायाचित्र )

गोवंडीतील शिवाजी नगर परिसरातील जुलै महिन्यात एका घरात चार मृतदेह सापडल्या प्रकरणी पोलिसांच्या तपासात पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुख शकील खान याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. अखेर रविवारी याप्रकरणी मृत शकील खान विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>> पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग अखेर पालिकेकडे; मार्ग हस्तांतरित करण्याबाबत एमएमआरडीएला पत्र

शकील जलील खान (३४), रजिया खान (२५), सरफराज खान (७) आणि अतिसा खान ( ३) यांचे मृतदेह २९ जुलैला शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी येथील राहत्या घरी सापडले होते. याच परिसरात त्याचे किराणा मालाचे दुकान होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात शकील खाननेच पत्नी व मुलांना वीष देऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे तपासात उघड झाले आहे. तपासी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग अखेर पालिकेकडे; मार्ग हस्तांतरित करण्याबाबत एमएमआरडीएला पत्र

संबंधित बातम्या

“एक पठ्ठ्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम…”, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका
विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
प्रवीण दरेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा ; मुंबै बँक कथित घोटाळय़ातून नाव वगळले  
ठराविक उद्योजकांना खूश करण्यासाठी प्लास्टिकवरील निर्बंध शिथिलच पर्यावरणप्रेमींचा आरोप
‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती; निती आयोगाच्या धर्तीवरील संस्थेत ठाण्याचे विकासक अजय आशर
डिसेंबर सर्वाधिक थंडीचा महिना; राज्यभर किमान तापमान सरासरीखाली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण