एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत त्रिसदस्यीय समितीची सरकारची तयारी

महागाई भत्त्यात वाढ करावी आणि त्यानंतर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

संघटनेकडून ठोस आश्वासनाची मागणी; सोमवारी पुन्हा सुनावणी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत झालेल्या न्यायालयीन सुनावणीत शनिवारीही तोडगा निघाला नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अर्थ व परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांची विशेष समिती स्थापन करण्याची तयारी असल्याचे उच्च न्यायालयात शनिवारी सांगितले. मात्र त्याबाबतचा शासननिर्णय तातडीने काढावा आणि समितीचे कामकाज रविवारपासूनच सुरू करण्याचा आग्रह कर्मचारी संघटनेने धरला. न्यायालयानेही या प्रकरणी राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करून सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. 

महागाई भत्त्यात वाढ करावी आणि त्यानंतर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. उच्च न्यायालयाने संप मागे घेण्याचे आदेश देऊनही संप मागे घेण्यात आलेला नाही. याउलट कर्मचारी संघटनेने पहिल्या दोन सुनावण्यांकडे पाठ फिरवली. संप मागे घेण्याचे बजावूनही तो मागे न घेणारे कामगार संघटनेचे नेते अजितकुमार गुजर यांना न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच त्यांनी स्वत: हजर राहून त्यांच्यावर अवमानप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये हे स्पष्ट न के ल्यास त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता.

न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर शनिवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. त्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल आणि ही समिती आपला अहवाल न्यायालयात सादर करेल, असे सरकारी वकील भूपेश सामंत यांनी न्यायालयाला सांगितले. तर या समितीला आमचा विरोध नाही. परंतु समितीबाबतचा शासननिर्णय आजच काढण्यात यावा व समितीने उद्यापासूनच कामाला सुरुवात करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने के ली. तसेच मागण्यांबाबत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचेही संघटनेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर समितीबाबत आजच शासननिर्णय काढणे शक्य नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट के ले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Government prepares a three member committee on the demands of st workers akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या