मुंबई : विद्यार्थ्यांना करियरच्या दृष्टीने अनेक संधी आहेत. पण ते निवडताना, त्यासाठीचे क्षेत्र निवडताना आपल्याला आनंद मिळतो का? समाधान मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे. कारण कोणतेही करियर क्षेत्र श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. समाजासाठी डॉक्टर, अभियंता, वकील, पत्रकार, पोलीस, प्रशासक, लेखक अशी सर्वाची गरज असून यातील कोणताही घटक एकमेकांपेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. तेव्हा हे लक्षात घ्या आणि आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड करा, अशा शब्दांत विशेष पोलीस महानिरीक्षक (महाराष्ट्र राज्य मानवी आयोग, मुंबई) डॉ़ रवींद्र शिसवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत शनिवारी ते बोलत होते. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा असे सांगतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे करियरची उत्तम संधी उपलब्ध होत असून या क्षेत्राकडे का यावे, याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा या सेवेत तुमची सुरुवातच उच्च पदापासून होते आणि कमी कलावधीतच एक एक पद पुढे जात सर्वोच्च पदापर्यंत जाता येते. त्यामुळे यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे यूपीएससी ही समान संधी देते. मग तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असा, अभियंता असा, डॉक्टर असा कोणीही ही परीक्षा देऊ शकते. तुमच्या गुणवत्तेचा आणि बुद्धिमत्तेचा कस येथे लागतो. यावर तुमची निवड होते असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great career opportunity competitive exams special inspector general of police guided ysh
First published on: 29-05-2022 at 00:59 IST