scorecardresearch

Ganesh Chaturthi 2022: जीएसबी गणेश मंडळाने उतरवला ३१६.४० कोटींचा विमा, ६६ किलो सोन्याने मढवली मूर्ती

पूजा आणि इतर सेवांसाठी मंडळाकडून भाविकांसाठी ‘क्यू ऑर कोड’ स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे

Ganesh Chaturthi 2022: जीएसबी गणेश मंडळाने उतरवला ३१६.४० कोटींचा विमा, ६६ किलो सोन्याने मढवली मूर्ती
(संग्रहित छायाचित्र)

‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ अशी ओळख असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा गणेश मंडळांने ३१६.४० कोटींचा विमा उतरवला आहे. या विम्यामध्ये ३१ कोटी ९७ लाखांचे सोने, चांदी आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. मंडळाचे स्वयंसेवक, पुजारी, आचारी, चप्पल स्टँडवरील कामगार, सुरक्षा रक्षकांसह इतर कामगारांसाठी २६३ कोटींचा वैयक्तिक विमा मंडळाने उतरवला आहे.

Ganesh Chaturthi 2022: या वर्षी कधी होणार गणरायाचे आगमन; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि शुभ मुहूर्त

याशिवाय भुकंप आणि आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी १ कोटीच्या विम्याची तरतूद या मंडळाने केली आहे. ‘द न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनी’कडून मंडळाने हा विमा उतरवला आहे.  यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाचे भान राखून जीएसबी मंडळाने शाडू मातीची गणेशमूर्ती बनवली आहे. ही मूर्ती ६६ किलो सोनं, २९५ किलो चांदीसह मौल्यवान रत्नांनी मढवण्यात आली आहे. पूजा आणि इतर सेवांसाठी मंडळाकडून भाविकांसाठी ‘क्यू ऑर कोड’ स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

“त्यांनी लाज लज्जा सगळं सोडलं,” बंडखोरांवर उद्धव ठाकरेंनी डागली तोफ, म्हणाले “निष्ठेचा झरा…”

नवसाला पावणारा अशी ओळख असणारा जीएसबी गणपती मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून ओळखला जातो. १९५५ साली जीएसबी समाजातील माधव पुराणिक यांनी या गणेशोत्सवाला सुरूवात केली. त्याकाळी मर्यादीत स्वरूपात सुरू झालेली ही गणेशपूजा आज भव्य दिव्य झाली आहे. जीएसबी मंडळ हे सार्वजनिक गणेशमंडळ असले तरीही या गणेशमूर्तीची स्थापना केवळ ५ दिवसांसाठी मुंबईतील किंग सर्कल येथील जी.एस. बी स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर केली जाते. जीएसबी गणपतीसाठी खास दिखाव्याची किंवा थीमची रोषणाई केली जात नाही. हे मंडळ केवळ धार्मिक परंपरेनुसार नियमित पूजा करते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gsb ganesh mandal took insurance policy worth 316 40 crores rvs

ताज्या बातम्या