वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील ३० व्या मजल्यावरुन उडी मारुन GST अधीक्षकाची आत्महत्या

या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबईत एका जीएसटी अधीक्षकाने कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीच्या ३० व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू अशी नोंद केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, हरिंदर कपाडिया (वय ५१) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी इमारतीवरुन उडी घेतल्यानंतर स्थानिक लोक तत्काळ घटनास्थळी गोळा झाले. त्यानंतर कपाडिया यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले.

या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gst superintendent allegedly committed suicide by jumping off the world trade centre in cuffe parade