Crime News : गुजरातच्या ४१ वर्षीय माणसाची मुंबईतल्या हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एका हिऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये हा माणूस मॅनेजर या पदावर काम करत होता. १४ वर्षीय मुलीवर त्याने हॉटेलमध्ये बोलवून लैंगिक अत्याचार केले. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. पीडित मुलगी त्याच्याच बरोबर त्याच्या फॅक्टरीत काम करत होती.

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

“हिऱ्यांच्या फॅक्टरीत मॅनेजर म्हणून काम करणारा हा इसम पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. या मुलीचे वडील पक्षाघाताने आजारी आहेत. तर तिचा भाऊ नोकरीला लागलेला नाही. या मुलीची आईही गृहिणी आहे. हा मॅनेजर मुलीला हॉटेलवर घेऊन गेला. तिथे त्याने तिचं लैंगिक शोषण ( Crime News ) केलं. तिच्यावर बलात्कार ( Crime News ) केला. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा मॅनेजर सदर मुलीला ब्लॅकमेलही करत होता. माझ्याबरोबर आली नाहीस आणि मी सांगतो ते केलं नाहीस तर तुझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करणार नाही असं त्याने पीडितेला सांगितलं होतं. त्यामुळे पीडिता त्याच्याबरोबर गेली होती.” अशी माहिती पोलिसांनी दिली.

From March 2025 new 108 Ambulance available on mobile app
‘१०८ रुग्णवाहिका’ आता ॲपद्वारे दारात, पत्ता सांगण्याचीही आवश्यकता नाही
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Bengaluru Diwali Firecrackers accident
VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

पोलिसांनी आणखी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हिरे फॅक्टरीत काम करणाऱ्या मॅनेजरचे आणि पीडित मुलीच्या कुटुंबाचे चांगले संबंध होते. हा मॅनेजर १४ वर्षांच्या या मुलीच्या घरी अनेकदा येत असे. वडिलांना पक्षाघात झाल्याने ते अंथरुणावर खिळून होते. त्यामुळे त्यांना भेटायचं निमित्त करुन हा मॅनेजर पीडित मुलीच्या घरी येत असे. तसंच या कुटुंबाला त्याने आर्थिक मदतही केली आहे असंही एका पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

आईने मुलीवर काम करण्यासाठी दबाव टाकला

या माणसाचा स्वभाव चांगला वाटल्याने आणि त्याने तो विश्वास संपादन केल्याने पीडित मुलीच्या आईने मुलीवर हिऱ्यांच्या फॅक्टरीत काम करायला जा म्हणून तगादा लावला होता. अखेर तो दबाव आल्याने या मुलीने काम करण्यास सुरुवात केली. या मॅनेजरवर विश्वास बसल्याने पीडित मुलीला त्याच्याबरोबर कुटुंबाने पाठवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ ऑक्टोबरला हा मॅनेजर मुलीच्या घरी गेला. त्याने सांगितलं मी माझ्या कुटुंबासह मुंबईला जात आहे. त्यावेळी त्याने तुमच्या मुलीलाही घेऊन जातो म्हणून या मुलीच्या कुटुंबाला सांगितलं. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास या माणसाने मुलीला तिच्या घरुन आपल्याबरोबर घेतलं आणि तिला घेऊन तो मुंबईला आला. अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर मुंबईत तो ज्या हॉटेलमध्ये रुम घेणार होता तिथे त्याने आधीच हे कळवलं होतं की मी माझ्या १४ वर्षांच्या मुलीसह रुमवर ( Crime News ) येतो आहे. त्यासाठी त्याने बनावट आधारकार्डही बनवून घेतलं होतं, जे रुम मिळावी म्हणून हॉटेलला सादर केलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे पण वाचा- Kolkata Rape and Murder : “मला अडकवलं जातं आहे, कारण..” ; आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय काय म्हणाला?

मुंबईतल्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली की, जेव्हा हा माणूस त्या १४ वर्षांच्या मुलीला हॉटेलच्या रुमवर घेऊन गेला तेव्हा त्याने तिचं लैंगिक शोषण ( Crime News ) करण्यास सुरुवात केली. तसंच माझं ऐकलं नाहीस तर तुझ्या कुटुंबाला मी आर्थिक मदत करणार नाही असं सांगितलं. एवढंच नाही तर माझं ऐकायचं नसेल तर जेवढे पैसे मी खर्च केले आहेत ते परत दे असंही त्याने मुलीला सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या माणसाने मुलीवर बलात्कार ( Crime News ) करण्याआधी स्टॅमिना वाढवण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या. तिच्यावर बलात्कार ( Crime News ) करत असताना तो कोसळला. त्याला खाली कोसळलेलं पाहून या मुलीने हॉटेलच्या स्टाफला बोलवलं. ज्यानंतर या माणसाला तातडीने जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं. जे. जे. मधील डॉक्टरांनी या माणसाला मृत घोषित केलं. या प्रकरणानंतर मुलीचा आणि तिच्या आईचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच POCSO अंतर्गत गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

Story img Loader