scorecardresearch

Premium

“फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवारांनी रचला”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, “मला अटक झाली तेव्हा…”

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

Gunaratna Sadavarte allegation on sharad pawar
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात केला होता. दरम्यान, यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी खळबळजनक दावा केला आहे. फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवार यांनी रचना असल्याचे ते म्हणाले. मुंबई माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – उदय सामंत म्हणाले २८ तास, दीपक केसरकर म्हणतात ७६ तास; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्होसमध्ये किती तास थांबले?

jayant patil on chandrashekhar bavankule, jayant patil criticize chandrashekhar bavankule, invitation given to rahul gandhi to come baramati
“…तर बावनकुळेंना दारोदारी का फिरावे लागत आहे?”, जयंत पाटील यांचा टोला
Raosaheb Danve meets AJit Pawar
नाराजीच्या चर्चेदरम्यान रावसाहेब दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले…
Hasan Mushriff
“भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्री…”, हसन मुश्रीफांना भाजपा नेत्याचा टोला; म्हणाले, “कोल्हापुरात संघर्ष अटळ”
Aditya-Thackeray-Uday-Samnat
“हा आहे माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च, आता…”, उदय सामंत यांच्याकडून हिशोब मांडत विरोधकांना उत्तर

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

“दिलीप वळसे पाटील यांच्या तोंडून काल ‘कट’ असा एक शब्द निघाला. त्या शब्दाचा मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मला अटक करण्यात आली होती. त्या अटकेनंतर एक श्रृंखला सुरू झाली. पोलिसांना माहिती होतं की मी कोर्टात युक्तीवाद करत होतो. मात्र, त्यांच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं. अटकेनंतर ते माझ्या लक्षात आलं”, अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.

“कसंही करून आम्हाला अडकवायचा प्रयत्न होता”

“निनोटपालांची डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते निनोटपाल वारंवार मला लॉकअपमधून बाहेर काढत होते. मला एका ठिकाणी बसवलं जायचं आणि जी चर्चा केली जात होती, ती शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची कमी आणि इतर गोष्टींची जास्त जात होती. नागपूर, आरएसएस, राईटविंग आणि देवेंद्र फडणवीसांची भेट याच मुद्द्यांभोवती तपास फिरवला जात होता. मी त्यांना सांगत होतो, तुमचा तपास चुकीचा सुरू आहे. मात्र, कसंही करून त्यांना आम्हाला अडकवायचं होतो”, असा आरोपही सदावर्ते यांनी केला.

“राजकीय नेत्यांची नार्को टेस्ट करा”

“हा कट कुठं रचला गेला मला माहिती आहे. मला अटक झाल्यानंतर काही नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. संजय पांडे उसुद्धा या बैठकीत उपस्थित होते. तिथेच हा कट रचण्यात आला. त्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला”, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच याप्रकरणी दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील आणि अजित पवारांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही सदावर्ते यांनी केली.

हेही वाचा – ‘आदित्य ठाकरेंना अनुभव नाही’ म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अरविंद सावंतांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या दिव्याखाली…”

“कटाचे मास्टरमाईंड शरद पवार”

“आरोपी गुन्हेगार गुन्हा करतो. मात्र, एकतरी पुरावा सोडून जातो. गावदेवी पोलीस ठाण्यातील एक हार्डीस्क आहे, ती एकदोन दिवसांची नाही, त्यात दोन वर्षांचं रेकॉर्डींग आहे. ती आणा, कोल्हापुरातील फुटेज आणा, त्यातून हा कट कशाप्रकारे रचण्यात आला होता, हे लक्षात येईल, असेही ते म्हणाले. या सर्वामागे मास्टरमांईड शरद पवार आहेत”, आरोपही त्यांनी केला.या सर्वामागे मास्टरमांईड शरद पवार आहेत. त्यांच्याच काळात दाऊद इब्राहीम मोठा झाला, आपल्या देशातील लोकांना मारून गेला. शरद पवारांचं डोकं आजारी असतानाही खूप चालतं, असा आरोपही त्यांनी केला. शरद पवार इतके घाणेरडे राजकारणी कोणीच नाही. मराठा युवकांची दिशाभूल करणारे, महाराष्ट्राची जातीपातींमध्ये विभागणी करणारे आणि देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट रचणारेही शरद पवारच आहेत, अशी टीकाही सदावर्ते यांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gunaratna sadavarte allegation on sharad pawar to plotted conspiracy to arrest devendra fadnavis spb

First published on: 25-01-2023 at 14:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×