जनगणनेच्या कामात समन्वयकाची भूमिका पार पाडल्याबद्दल माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री खासदार गुरुदास कामत यांना  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शुक्रवारी सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडला. जनगणनेच्या २०११ मध्ये झालेल्या कामात योग्य समन्वय आणि मेळ ठेवण्याचे काम गृहराज्यमंत्री म्हणून कामत यांनी केले होते. जनगणनेच्या कामाची जबाबदारी कामत यांच्याकडे होती. चांगले काम केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.