मुंबई : अपंग प्रवाशांना देण्यात येणारे सवलतीचे ओळखपत्र किंवा कागदी ओळखपत्र बदलण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला असून आता अपंग प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी या प्रवाशांना आगार किंवा बस स्थानकात खेटे घालण्याची गरज नाही. त्यांना ते घरपोच मिळेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : मुंबई : कर्जाच्या वादातून भाच्याने केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू

Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
mumbai municipal corporation clean up marshal
मुंबई: स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने ७५ हजार रुपये दंड वसूल
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर कुरघोडी! मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी

डिजिटल तिकीट सेवेला चालना देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट चलो ॲप, स्मार्ट कार्ड बसपास, एनसीएमसी कार्ड बसपास आदी योजना सुरू केल्या. आता उपक्रमाने अपंग प्रवाशांना देण्यात येणारे सवलतीचे ओळखपत्र किंवा कागदी ओळखपत्र बदलण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.

विशेष सवलतीसाठी अपंग प्रवाशांना बेस्ट चलो ॲप डाउनलोड करून बसपासच्या मान्यतेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. स्मार्ट फोन उपलब्ध नसलेल्या अपंग प्रवाशांच्या घरी स्मार्ट कार्ड पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी सेवा केंद्रातून विशेष सवलत घेणाऱ्या पासधारकांशी संपर्क साधण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्मार्ट कार्डसाठी इच्छुक असलेल्यांसाठी घरपोच सेवा उपलब्ध करण्यात आली आहे, असे उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

इच्छुकांनी सेवा केंद्रातील टोल फ्री क्रमांक १८००२२७५५०, दूरध्वनी क्रमांक ०२२-२४१९०११७ वर संपर्क साधावा. बेस्ट चलो ॲपद्वारे जुने कार्ड बदलून नवीन स्मार्ट कार्ड घ्यावे, अन्यथा १५ सप्टेंबर २०२२ पासून जुने बसपास अवैध ठरतील, असे उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले.